शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रोटोकॉलचा फटाका फुटलाच नाही...!

By admin | Updated: November 3, 2016 00:40 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला लिहिलेल्या पत्राचा फटाका फुटलाच नाही.

पुणे : महापालिकेकडून राजशिष्टाचाराचा भंग होतो त्याबाबत चौकशी करावी, अशा आशयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला लिहिलेल्या पत्राचा फटाका फुटलाच नाही. पालिका प्रशासनाने दाखविलेले पुरावे ग्राह्य धरून नगरविकास विभागाने पालिकेला क्लीन चिट दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद; तसेच जिल्ह्यातील अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्थांनाही अशीच क्लीन चिट मिळाली असल्याचे समजते.महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. ते व पालकमंत्री बापट यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद होत आहेत. पालिका प्रशासनाच्या २४ तास पाणी योजनेतील पाणीटाक्या बांधण्याच्या जाहीर कार्यक्रमात या वादाचा कळस झाला. कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, जाहिरातींमध्ये पालकमंत्र्यांचे नाव टाकले नाही, असा आरोप करून बापट यांनी महापौरांना धारेवर धरले. त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निदर्शनेही केली होती. नगरविकास विभागाने याची दखल घेत पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्हा परिषद व अन्य स्थानिक संस्थांच्या या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना २७ आॅक्टोबरला मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे २८ आॅक्टोबरला पुणे महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी, महापौरांच्या स्वीय सहायक योगीता भोसले यांच्याशीही मुंबईत चर्चा केली. पारखी व भोसले यांनी पालिकेच्या गेल्या वर्षभरातील सर्व जाहीर कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका, कार्यक्रमांआधी बापट यांना लिहिलेली पत्रे, मेल, तसेच कार्यक्रमांच्या ठिकाणी लावलेल्या कोनशिला यांची छायाचित्रे नगरविकास विभागाचे उपसचिव गोखले यांना दाखवली. ते पाहिल्यानंतर गोखले यांनी तक्रारीत तथ्य दिसत नाही, असे सांगून पारखी, भोसले यांना जाण्यास सांगितले.