शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय जोडप्यांना संरक्षण

By admin | Updated: April 17, 2017 02:44 IST

आंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने

संदीप भालेराव, नाशिकआंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने आता आंतरजातीय जोडप्यांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची तयारी चालविली आहे. गावबंदी, कुटुंबांकडून येणाऱ्या धमक्या तसेच प्रसंगी ‘आॅनर किलिंग’पासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह कायद्याची निर्मिती करीत आहे. त्याची समितीदेखील स्थापन झाली असून, समाजकल्याण मंत्री आणि अधिकारी, कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवा कायदा तयार केला जाणार आहे. समाजातील जातीय दुरावा कमी व्हावा, सलोखा निर्माण व्हावा यासाठी आंतरजातीय विवाहाला कायद्यान्वये मान्यता असून शासनाकडून अनेक सुविधा, आर्थिक मदत दिली जाते. १आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची नोंदणी १९५५ च्या विशेष विवाह कायद्यांतर्गत केली जाते. मात्र त्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नाही. त्यांची केवळ नोंदणीच होते. त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना रोखता आलेल्या नाहीत. २१९१९च्या काळात आंतरजातीय विवाहांना बेकादेशीर ठरविले जात होते. त्यांना कायदेशीर करण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतंत्र कायदा केला होता. त्यासाठी त्यांनी रुढीपरंपरांना फाटा दिला होता. समाजसुधारणेतील हे एक क्रांतिकारक पाऊल मानले गेले.३आंतरजातीय जोडप्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, विधी खात्याचे सचिव, समाजकल्याण आयुक्त आणि बार्टीचे महासंचालक यांचा समावेश आहे. ४आता शासनाने स्वतंत्र कायदा तयार करून अशा जोडप्यांना भयमुक्त करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक संरक्षण नव्या कायद्यामुळे होणार आहे.