शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी प्राण्यांचे संरक्षण होणे गरजेचे - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 26, 2017 03:20 IST

पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे.

मुंबई : पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे. अ‍ॅनिमल हॉस्पिटल तथा केअर सेंटरच्या निर्मितीकामी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. राज्य शासनाच्या वन विभागाने जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. पूर्वी लोक वन्य प्राण्यांना शत्रू समजत असत, पण वन विभागाने याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे आता जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लोक स्वत:हून पुढे येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.टाटा ट्रस्ट आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल यांच्यामार्फत मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या अ‍ॅनिमल हॉस्पिटल आणि केअर सेंटरचे भूमिपूजन शुक्रवारी हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मेनका गांधी म्हणाल्या, ‘निसर्गातील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. निसर्गातील प्राण्याची एखादी प्रजाती नष्ट झाली, तर त्याचा पर्यावरणावर मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)