शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागांचे संरक्षण करा

By admin | Updated: January 31, 2016 01:43 IST

पाणथळी जागांचे संरक्षण केलेच पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागांवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बांधकाम करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

मुंबई : पाणथळी जागांचे संरक्षण केलेच पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागांवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बांधकाम करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच या वादग्रस्त जागांवर बांधण्यात आलेल्या बांधकामांबाबत दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ५४ केसेस एका महिन्यात निकाली काढण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाला दिला.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पाणथळ जमिनीवर भराव टाकण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी कचराही टाकण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याने अ‍ॅड. झमन अली यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. महापालिकेने बजावलेल्या ‘कारणे-दाखवा’ नोटीसला विकासक दिवाणी न्यायालयात आव्हान देऊन नोटीसवर स्थगिती मिळवत आहेत. त्यामुळे पाणथळीच्या जागांवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे शक्य नसल्याचे अ‍ॅड. अली यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. ‘२०१३ ते आतापर्यंतचे सगळे आदेश लक्षात घेतले तर राज्य सरकारला या जागांचे संरक्षण करण्याबाबत वारंवार सांगण्यात आले. असे असतानाही याचिकाकर्त्यांनी नमूद केलेल्या पाणथळीच्या जागांवर वेगाने बांधकाम सुरू आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. वसई येथील कनाकिया पार्क, एस्सेल वर्ल्ड,दहिसर लिंक रोड येथील गोराई पाणथळ जमीन, ठाण्यातील घोडबंदर रोड, विक्रोळी आणि मुलुंड येथील पाणथळीच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणील पोलीस उपायुक्तांना पोलिसांचे एक पथक नेमून पाणथळीच्या जागांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच खंडपीठाने दिले होते. (प्रतिनिधी)आदेशांचे पालन कराउच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय पाणथळीच्या जागांवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिला आहे.या आदेशानुसार नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतांना पाणथळीच्या जागांवर बांधकाम करण्याची परवानगी देऊ नका, असा आदेश दिला. मात्र, या आदेशांचे पालन करण्यात आलेले नाही.