शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज पुरोहितांचे प्रतोदपद धोक्यात?

By admin | Updated: June 29, 2015 02:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांवर तोंडसूख घेणारे भाजपाचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित यांना विधानसभेतील प्रतोदपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांवर तोंडसूख घेणारे भाजपाचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित यांना विधानसभेतील प्रतोदपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र पुरोहित यांच्यावर यापेक्षा कडक कारवाई न करता समज देऊन या प्रकरणावर पडदा पाडण्याच्या हालचाली भाजपात सुरु आहेत.पुरोहित यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता पक्षाने नोटीस बजावली असून तीन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वपक्षीय आमदार मंगलप्रभात लोढा यांना लक्ष्य करणाऱ्या पुरोहित यांना विधानसभेच्या प्रतोद पदावरून दूर केले जाण्याचे संकेत भाजपाच्या एका नेत्याने दिले. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्तीला प्रतोदपदावर ठेवण्यास आमदारांकडून विरोध केला जाण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी पुरोहित यांच्यावर विधिमंडळ पक्षाकडून कारवाई होईल, असे या नेत्याने सांगितले. पुरोहित हे आपल्या बेलगाम वक्तव्यामुळे प्रथम अडचणीत आलेले नाहीत. यापूर्वीही त्यांनी अशा चुका केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करून विरोधकांच्या हाती कोलीत देण्याची पक्ष नेतृत्वाची इच्छा नाही. समज देऊन हे प्रकरण जेवढ्या लवकर थंड्या बस्त्यात टाकता येईल तेवढे भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. पुरोहित यांच्या राजकीय भवितव्यावर या घटनेचा विपरीत परिणाम होणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या सध्या २०० कोटींच्या वादग्रस्त खरेदीमुळे अडचणीत आल्या आहेत. त्याचवेळी राज पुरोहित यांचे स्टींग उघड झाले आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा या कन्या आहेत तर पुरोहित हे कट्टर मुंडे समर्थक आहेत. त्यामुळे पुरोहित यांच्यावर कारवाई केल्यास मुंडे समर्थकांना हेतूत: अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्याची संधी मिळेल, अशी भीती पक्षातील काहींना वाटते. (विशेष प्रतिनिधी) शिस्तपालन समिती आहे कुठे? 

राज पुरोहित यांना प्रदेश भाजपाने शिस्तभंगाकरिता नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्षात पक्षाची शिस्तपालन समिती कुठे आहे, असा सवाल केला जात आहे. राम नाईक हे दीर्घकाळ महाराष्ट्रातील शिस्तपालन समितीचे अध्यक्ष होते. नाईक हे राज्यपालपदावर नियुक्त झाल्याने नवी समिती नियुक्त केलेली नाही. नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नवे पदाधिकारी जाहीर करताना शिस्तपालन समितीच्या नावांची घोषणा केली किंवा कसे ते पक्षाच्या नेत्यांनाही स्मरत नाही.