शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग; विरोध झुगारून थेट अधिसूचना! बाजारभावापेक्षा जागेला २५ टक्के जादा दर

By admin | Updated: May 4, 2017 04:06 IST

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविलेला असताना शासन

नाशिक : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविलेला असताना शासन मात्र महामार्गासाठी जागा  संपादित करण्यावर ठाम असून, जागा मालक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक रक्कम देऊन थेट जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात देऊन महामार्गात जाणारे गटही अंतिमत: जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, यापूर्वी संयुक्त मोजणी दरम्यानही शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करून मोजणी बंद पाडली. तथापि, फक्त जागा मोजणी करू द्या, ती संपादित करायची किंवा नाही याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल, असे आश्वासन महसूल खात्याकडून दिले गेले तर शेतकऱ्यांच्या मोजणीसाठी हरकती नोंदवून जागा मोजणीचे काम करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात शंभर टक्के मोजणी पूर्ण झाली असली तरी, सिन्नर तालुक्यात मात्र पाच ते सहा गावांची मोजणी अपूर्ण आहे. तेथेही शासनाच्या अधिकाऱ्यांनी फक्त मोजणी करू देण्याची गळ जागा मालक शेतकऱ्यांना घालण्यात  आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष जागा घेण्यापूर्वी शाासनाकडून जागा  मालक शेतकऱ्यांशी बोलणी करून काही तरी सकारात्मक  तोडगा निघण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून होते, मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधाची पर्वा न  करता समृद्धी महामार्गात  जाणाऱ्या जागांचे गावनिहाय गट व आकारमान प्रसिद्ध करून थेट जागा खरेदीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार ज्या शेतकऱ्यांना महामार्गासाठी जागा द्यायची आहे अशांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील व निफाडचे प्रांत महेश पाटील या दोघा उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांच्या कार्यालयात या संमतीपत्राचे नमुने ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)जागांचे मूल्यांकन सुरूसमृद्धीसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या जागांचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी तलाठ्यांमार्फत गेल्या तीन वर्षांत गावात झालेल्या व्यवहारांची माहिती संकलित केली जात असून, दुय्यम निबंधकांकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी जमिनीच्या दराची सरासरी काढून मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे.