शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

देशविरोधी कट रचल्याचा गुन्हा सिध्द

By admin | Updated: April 1, 2017 17:50 IST

दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा न्या.ए.के. पटनी यांनी सुनावली.

सिमी खटल्याचा निकाल : जळगावच्या परवेज व आसिफ खानला 10 वर्षे सक्तमजुरीजळगाव : देशभर गाजलेल्या जळगावच्या सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा न्या.ए.के. पटनी यांनी सुनावली. फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये दोघांना शुक्रवारीच दोषी ठरविण्यात आले होते. महाराष्ट्रात हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रय} तसेच देशविघातक कृत्य करणा:या 10 जणांविरुध्द 25 जुलै 2001 रोजी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल 19 मे 2006 रोजी लागला होता. त्यात 6 आरोपींना शिक्षा झाली होती तर 4 आरोपी निदरेष मुक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत या गुन्ह्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. दोघांना 2006 मध्ये झाली अटक30 डिसेंबर 2006 रोजी आसिफला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांनी अटक करून 23 जुलै 2007 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते तर परवेजला 23 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी अटक करण्यात येऊन 20 ऑक्टोबर 2006 रोजी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झाल्याने आसिफ हा पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे तर परवेज जामिनावर होता.