शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादी पोलीस निरीक्षकावरच केले गुन्हे दाखल

By admin | Updated: July 7, 2016 02:32 IST

सिटी कोतवाली पोलिसांचा अजब कारभार; साडेतीन कोटींच्या लॉटरीचा गोंधळात गोंधळ.

अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याला साडेतीन कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर सदरची रक्कम देण्यास नकार देणार्‍या लॉटरी संचालकासह सिक्कीम सरकारविरुद्ध न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा मंगळवारी आदेश दिला. या आदेशामध्ये कोतवालीच्या तत्कालीन ठाणेदारांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दाखल करण्याचे नमूद असताना, सिटी कोतवाली पोलिसांनी आदेशाचे योग्य अवलोकन न करता फिर्यादी असलेल्या तत्कालीन ठाणेदारांवरच गुन्हे दाखल केल्याचा अजब-गजब प्रकार बुधवारी समोर आला. सिटी कोतवाली पोलिसांच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण नजरचुकीने झाल्याची सारवासारव करीत एक पत्र तयार करून ते न्यायालयामध्ये सादर केले आहे.पोलीस कर्मचारी संजय व्यंकटराव चक्रनारायण यांनी ऑगस्ट २0१५ रोजी गांधी रोड येथील नितीन मुरलीधर गोयनका याच्या लॉटरी दुकानातून सिक्कीम सरकारच्या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ४ ऑगस्ट २0१५ रोजी सोडत निघाल्यानंतर चक्रनारायण यांना ३ कोटी ४७ लाख रुपयांची लॉटरी लागली. त्यांनी लॉटरी संचालक नितीन गोयनका याला लॉटरी लागल्याचे सांगितले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर चक्रनारायण यांनी सिक्कीम सरकारच्या मुंबई येथील लॉटरीच्या मोठय़ा अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, त्यांनी थेट राष्ट्रीय ग्राहक न्यायालय, दिल्ली आणि अकोला न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फसवणुकीनुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाच्या आदेशाचे व्यवस्थित अवलोकन न करता ठाणा हजेरीवरील कर्मचार्‍याने सरकारतर्फे तत्कालीन कोतवाली ठाणेदार फिर्यादी असतानादेखील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना प्रथम क्रमांकाचे आरोपी बनविले.त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या सिक्कीम सरकार, नितीन गोयनका व आणखी दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. ही चूक दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवारी पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस वतरुळात खळबळ उडाली. पोलिसांनी चुकीची दुरुस्ती करण्यासाठी गोपनीय पद्धतीने न्यायालयात पत्र देऊन या प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे कोतवाली पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.