शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळात ४९ कोटींची कामे प्रस्तावित

By admin | Updated: February 22, 2016 02:17 IST

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत वीजप्रणाली बळकट करणार.

अतुल जयस्वाल / अकोला केंद्र सरकारने सुरू केलेली एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) आता राज्यातही लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या अकोला परिमंडळांतर्गत येणार्‍या २२ शहरांमध्ये ४८.८0 कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे.शहरांमधील वीजप्रणाली बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) सुरू केली आहे. या योजनेसाठी राज्य शासन, पॉवर फायनान्स कार्पोरेशन व महावितरण यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता गत महिन्यात देण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये २ हजार ४0५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील नगर परिषद व महानगरपालिका असलेल्या एकूण २२ शहरांमध्ये ४८.८0 कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अकोला जिल्ह्यात १७.४६ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात १९ कोटी, तर वाशिम जिल्ह्यात १२ कोटी रुपयांची कामे होणार आहेत.परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये ह्यआयपीडीएसह्ण योजनेंतर्गत विविध कामे होणार आहेत. यामध्ये ३३ केव्ही क्षमतेची आठ विद्युत उपकेंद्रे उभारणे, पाच ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणे, एका पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, ४६0 रोहित्रे बसविणे आदी कामे प्रस्तावित आहेत. वीजवितरण क्षेत्रात सुधारणा करणे व ग्राहकांना दज्रेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने ही कामे प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.