शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राणी बागेच्या प्रवेश शुल्कात प्रस्तावित वाढ अडचणीत

By admin | Updated: May 16, 2017 21:24 IST

भाजपच्या विरोधानंतरही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग)प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी ठाम

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - भाजपच्या विरोधानंतरही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग)प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी ठाम आहे. प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर पालिका प्रशासनाच्या पटलावर आणला. पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेच्या तिजोरीवर भार पडणार असल्याने ही शुल्क वाढ करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद प्रशासनाने केला आहे. त्याचवेळी ही दरवाढ रद्द करण्यासाठी सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन कंबर कसली आहे. या विरोधात वेळ पडल्यास कायदेशीर लढा देण्याची तयारीही या संस्थेने केली आहे. तर विरोधी पक्षांसह भाजपनेही या शुक्लवढीला रेड सिग्नल दाखवला असल्याने स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला. यावरून भाजप आणि शिवसेना आपसाद भिडले आहेत. ही दरवाढ होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे. तरीही सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीपुढे शुल्कवाढीचा प्रस्ताव आणला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ झालेली नाही. पेंग्विनच्या देखभालीचे कामं सध्या ठेकेदार करीत असून लवकरच पालिकेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. याचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडेल, असे या शुल्कवाढीचे समर्थन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार प्रवेश शुल्कात २० पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्ताव अडचणीत राणीबागेच्या शुल्कात वाढ करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी वादळी चर्चा होण्याचे संकेत आहे. मात्र ही दरवाढ म्हणजे मुंबईकरांच्या खिशात हात घालण्यासारखे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही विरोधाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान घेणे शिवसेनेला भाग पडणार आहे. मात्र भाजपचे संख्याबळ समान असल्याने विरोधकांच्या मदतीने हा प्रस्ताव फेटाळून भाजप शिवसेनेला मात देण्याची शक्यता अधिक आहे. सामाजिक संस्थांचा विरोध विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन स्थापन झालेल्या सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन या संस्थेने ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. हा कसला पारदर्शक कारभार? या शुल्कवाढीच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या उत्पन्नाचा खर्च राणीबागेतील उद्यान आणि प्राणिसंग्रहालयावर करण्याची तरतूद पालिकेच्या नियमात नाही. राणी बागेत पूर्वीपासूनच हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. पेंग्विनमुळे पर्यटकांचा आखाडा वाढल्याची धूळफेक प्रशासन करीत आहेत, असा आरोप या संस्थेचे पदाधिकारी व माजी पालिका आयुक्त द.मा.सुखटणकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. सध्या संस्थेमार्फत कायदेशीर बाबी तपासून घेण्यात येत असून वेळ पडल्यास ही दरवाढ रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा लढणार असल्याचे यावेळी संस्थतर्फे सांगण्यात आले. * स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या महासभेत पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तिथेही मंजुरी मिळाल्यानंतर त्या महिन्याच्या नंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे. * पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणी बागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आखाडा ३५ हजारपर्यंत पोहोचतो. असा पालिकेचा दावा आहे. मात्र राणीच्या बागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे. राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १00 रुपयेतीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी १00 रुपये.शालेय विद्यार्थ्यांसाठी -पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपये.खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये. सकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५0 रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्कफोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपयेपरदेशी पर्यटकांसाठी -१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये