शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग सवलतींचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर ठेवा

By admin | Updated: March 26, 2017 00:22 IST

मुख्यमंत्र्यांचे वस्त्रोद्योग विभागाला आदेश : अनिल बाबर यांची माहिती

विटा : यंत्रमागधारकांना पाच वर्षे कर्जावरील व्याज अनुदान आणि वीज दरात सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आगामी उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्याचे आदेश शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योग विभागाला दिले असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी शुक्रवारी रात्री दिली.राज्यातील यंत्रमाग व्यवसाय विविध कारणांमुळे अडचणीतून जात असल्याने यंत्रमागधारकांनी घेतलेली कर्जे भरणे अशक्य झाले आहे. परिणामी, इचलकरंजी येथे काही यंत्रमागधारकांनी आत्महत्या केली. तसेच मंदी व वीज दरातील वाढ यामुळे यंत्रमाग उद्योग बंद अवस्थेत असल्यामुळे, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमागधारकांच्या कर्जावर पाच वर्षासाठी ५ टक्के व्याज अनुदान व वीज दरात प्रति युनिट एक रूपया सवलत देण्याची घोषणा २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात केली होती. परंतु, त्याबाबत गतीने कार्यवाही न झाल्यामुळे गेल्या डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात याबाबत आ. सुरेश हाळवणकर, आ. अनिल बाबर यांच्यासह आमदारांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.यावेळी हिवाळी अधिवेशनावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी, महिन्याभरात सकारात्मक कार्यवाही करीत असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हा प्रस्ताव बरेच दिवस कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकांतून प्रलंबित राहिल्यामुळे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. हाळवणकर यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्याविरोधात हक्कभंग सूचना दाखल करण्याची अथवा विधानसभेत आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती.त्यामुळे मंत्री देशमुख यांनी तात्काळ कार्यवाही करीत या प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी देण्याची विनंती करणारे पत्र शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानमंडळात भेट घेऊन सादर केले. यावेळी मंत्री विजय देशमुख, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अबू आझमी, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुरेश पाटील, भरत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)कॅबिनेटची मान्यतावस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी, यंत्रमाग उद्योगाची असलेली बिकट अवस्था व सवलती तात्काळ लागू करण्याबाबतची असलेली गरज याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना वस्तुस्थिती सांगून तातडीने या प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर आगामी उच्चस्तरीय समितीसमोर हा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.