शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१७५ कोटींची मालमत्ता जप्त

By admin | Updated: November 8, 2015 00:14 IST

सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहारप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्काअन्वये गुन्हा दाखल झालेल्या घटनेत जिल्हा

नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहारप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्काअन्वये गुन्हा दाखल झालेल्या घटनेत जिल्हा प्रशासनाने मुख्य आरोपी असलेल्या घोरपडे बंधूंच्या सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. दोन पेट्रोलपंप, बारा वाहने, इमारती व अनेक रिकाम्या प्लॉट्सचा त्यात समावेश आहे. मोक्का न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून फरार असलेले संपत घोरपडे, अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर यांच्या मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेऊन त्याची यादी न्यायालयाला सादर केली होती. सिन्नर तालुक्यातील रेशन दुकानासाठी पाठविण्यात आलेला तांदूळ दुकानात न पोहोचविता टेम्पोमध्ये भरून घोटी येथे नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून वाडीवऱ्हे येथे पकडला होता. त्यावरून अगोदर संशयितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल झाला़ नंतर मात्र शासनाने मोक्काअन्वये कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक, इगतपुरी, दिंडोरी व सिन्नर या चार तालुक्यांतील तहसीलदारांकरवी घोरपडे याच्या मालकीच्या जागा, प्लॉट, शेती, गाळे, इमारतींच्या सातबारा उताऱ्यावर मालमत्ता जप्तीचे शिक्के मारण्यात आले. (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी तालुक्यातील जमिनी, नाशिकमधील गाळे, आलिशान घर, फ्लॅट, तीन मजली इमारत, म्हसरूळ व सिडकोतील पेट्रोलपंप, चार मालट्रक, दोन रिक्षा, तीन दुचाकी, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.