शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची गोळ्य़ा झाडून हत्या

By admin | Updated: November 4, 2015 03:08 IST

आर्थिक देवाण-घेवाणीतून घटना घडल्याचा संशय

अकोला - शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक तथा प्रॉपर्टी ब्रोकर किशोर खत्री यांची अज्ञात मारेकर्‍यांनी सोमठाणा शिवारात धारदार शस्त्र आणि गोळ्य़ा झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ माजली आहे. आर्थिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय असून पोलिसांनी काही संशयीतांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. प्रॉपटी ब्रोकर किशोर खत्री यांची चित्रा टॉकीजच्या जागेवरील कॉम्प्लेक्समध्ये भागीदारी आहे. यामधील बहुतांश गाळे खत्री यांच्या मालकीचे आहेत. मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजतादरम्यान खत्री एका कारमधून सोमठाणा परिसरात गेले होते. या कॉम्प्लेक्सच्या भागीदारीच्या जमा-खर्चावरून अज्ञात मारेकरी व किशोर खत्री यांच्यात वाद झाला. या ठिकाणी खत्री यांना बेदम मारहाण करण्यात आली. खत्री यांनी जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्याने ते रस्त्याच्या कडेला पडले. खत्री जमिनीवर कोसळताच त्यांचा गळाच चिरला. डोक्यावर व छातीवरही शस्त्रांनी हल्ला करुन गोळ्या झाडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खत्री यांचा मृतदेह सोमठाणा येथील ग्रामस्थांना दिसताच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख जितेंद्र सोनवने, जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी काही संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलीप खत्री यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.