शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

जाहिरातीचा संदेश उतरला!

By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST

मनसेच्या इशार्‍यानंतर बेस्ट प्रशासनाने २४ तासांच्या आतच बसगाड्यांवरील वादग्रस्त गुजराती जाहिरात काढण्यास सुरुवात केली.

मुंबई : मनसेच्या इशार्‍यानंतर बेस्ट प्रशासनाने २४ तासांच्या आतच बसगाड्यांवरील वादग्रस्त गुजराती जाहिरात काढण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रकरणात अडचणीत आलेल्या शिवसेनेने मौन बाळगून आपला बचाव केला आहे.
बेस्टच्या २00 बसगाड्यांवर संदेश या गुजराती वृत्तपत्राच्या जाहिरातींमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. या जाहिरातीतून संदेशने  मुंबईच्या वारशावरच घाला घातला असल्याचा आक्षेप मनसेने घेतला होता. मात्र, गुजराती भाषिकांवरील वादग्रस्त अग्रलेखाचा वाद ताजा असल्याने यावर शिवसेनेने मौन बाळगले आहे. बेस्ट प्रशासनाने मनसेच्या इशार्‍यानंतर आज सकाळीच कारवाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत १0 टक्के बसगाड्यांवरील गुजराती जाहिरात काढून टाकण्यात आली. २00 बसगाड्यांवर या जाहिराती असल्याने त्यावर कारवाई करण्यास दोन दिवसांचा कालावधी लागेल. सोमवारपर्यंत सर्व जाहिराती काढण्यात येतील, असे बेस्टचे प्रवक्ता ए. तांबोली यांनी 
सांगितले. (प्रतिनिधी)
 
गुजराती वृत्तपत्राच्या आक्षेपार्ह जाहिरातीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरीत शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण शेकण्यापूर्वी शिवसेनेनेही बाजू सावरुन धरण्याचा प्रयत्न आता सुरु केला आहे. मात्र भाजपाने यावर भाष्य करण्यास नकार देऊन एकप्रकारे गुजराती वृत्तपत्राच्या मजकुराचे सर्मथन केले आहे.
 
काँग्रेसने विचारला जाब
मुंबईच्या विकासात सर्व धर्मीयांचे योगदान आहे. त्याचे श्रेय कोणता पक्ष अथवा समाज घेऊ शकत नाही.  खरेतर शिवसेनेने यापूर्वी ही कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु मित्रपक्षापुढे मूग गिळून बसलेल्या शिवसेनेचे मराठीवरील बेगडी प्रेम यातून दिसून आले.
- देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते 
 
भाजपाचा भाष्य करण्यास नकार
त्या जाहिरातीबद्दल मला वृत्तपत्रातून कळले. पण, या विषयावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. याबाबत वरिष्ठच भाष्य करतील.
- मनोज कोटक, भाजपाचे गटनेते