शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल

नागपूर : राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. अनिल सोले व नागो गाणार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात आले आहे. खाजगी जमिनीवरील बांबूस वाहतूक पासच्या बंधनातून मुक्त करणे, बांबू क्षेत्रातील उद्योजकांना ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकरीत्या बांबू पुरवठा करणे तसेच बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे यांचा समावेश असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.ठाणे, पालघर जिल्ह्यात तीन महिन्यात १५६ बालमृत्यूएप्रिल ते जून २०१४ या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.हे सर्व बालमृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत तीव्र कमी वजनाची १३ हजार ५१४, मध्यम कमी वजनाची ५६ हजार ७४६ बालके आढळून आली होती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कामकाजामुळे त्यांना कुपोषित म्हणता येणार नसल्याचे या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.वनक्षेत्रांवरील अतिक्रमण तीन महिन्यात हटविणारऔरंगाबाद वनविभागांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण येत्या तीन महिन्यात हटविण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जयंत पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एप्रिल २०१४ अखेर असलेल्या १०७ हेक्टर ३३ आर वनक्षेत्रातील अतिक्रमणापैकी ६१.१८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. सतेच ११.५० हेक्टर अतिक्रमित क्षेत्राची दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित २६.६५ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या तीन महिन्यात ही अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्यात येतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.तिवरांच्या जंगलांवर बेकायदा भरावमुंबईतील मालाड येथील मार्वे समुद्रकिनाऱ्याजवळील टॅबच्या पार्किंगशेजारी असलेल्या तिवरांच्या जंगलात बेकायदा भराव टाकून घरे बांधण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या क्षेत्रावर भरावापूर्वी तिवराचे जंगल असल्याचे गुगल इमेजवरून लक्षात आले. यासंदर्भात पश्चिम मुंबईच्या वनक्षेत्रपालांनी बोरीवलीच्या तहसीलदारांना अहवाल पाठवला असू यावर नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)