शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांना मालमत्ता कराचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: January 13, 2016 01:45 IST

वादग्रस्त ठरलेला शहराचा विकास नियोजन आराखडा पुढे ढकल्यानंतर आता झोपडपट्ट्यांना एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णयही सत्ताधारी शिवसेना-भाजपा

मुंबई : वादग्रस्त ठरलेला शहराचा विकास नियोजन आराखडा पुढे ढकल्यानंतर आता झोपडपट्ट्यांना एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णयही सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने लांबणीवर टाकला आहे़ पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राजकीय कोंडी टाळण्यासाठी विधी समितीच्या पटलावर असलेला हा प्रस्ताव तांत्रिक सबब देत पुढे ढकलण्यात आला आहे़मुंबईत वाढत्या बेकायदा झोपड्या व बांधकामांनी या शहराला बकाल केले आहे़ अशा बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी झोपडपट्ट्यांनाही मालमत्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे़ गेली अनेक वर्षे हा प्रस्ताव चर्चेत होता, मात्र झोपडपट्ट्या या राजकीय पक्षांसाठी मोठ्या व्होट बँक असल्याने असा कर लागू करण्यास राजकीय उदासीनता दिसून येते. त्यातच पुढच्या वर्षी पालिका निवडणुका असल्याने हा प्रस्ताव युतीसाठी अडचणीचा ठरणार आहे़ त्यामुळेच विधी समितीच्या पटलावर आलेल्या या धोरणाला सर्वपक्षीय सदस्यांनी आज विरोध दर्शविला़ बेकायदा झोपड्यांकडून मालमत्ता कर वसूल केल्यास त्या अधिकृत होतील, अशी भीती काहींनी व्यक्त केली़ तर केंद्र सरकार, खाजगी व पालिकेच्या मालकीच्या जागांवर असलेल्या झोपड्यांबाबत काय धोरण असेल, अशा अनेक शंका सदस्यांनी व्यक्त करीत हे धोरण लांबणीवर टाकले़ (प्रतिनिधी)35,594 मालमत्ता शहरात असून उपनगरातील मालमत्तांची संख्या १ लाख ५६ हजार ८३१ आहे़ मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी सुमारे साडेतीन हजार कोटींचा महसूल मिळतो़ ९९० कोटींचा महसूल अपेक्षितमुंबईतील ५४ टक्के म्हणजेच जवळपास ६० लाख नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत़ सध्या झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लागू नाही़ किमान कर आकारला तरी झोपडपट्ट्यांकडून पालिकेला ९९० कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित आहे़