शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अभिमत विद्यापीठांमधील गुणवत्ता यादी लांबणीवर

By admin | Updated: August 30, 2016 05:26 IST

राज्यातील अभिमत (डिम्ड्) विद्यापीठांमधील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठीची हंगामी गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामायिक प्रवेश सेलने आज पुढे ढकलला आहे

मुंबई : राज्यातील अभिमत (डिम्ड्) विद्यापीठांमधील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठीची हंगामी गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामायिक प्रवेश सेलने आज पुढे ढकलला आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संबंधी असलेल्या याचिकेवर मंगळवारी निर्णय अपेक्षित असून त्यानंतरच या बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. अभिमत विद्यापीठांमधील हंगामी गुणवत्ता यादी २७ आॅगस्टला जाहीर करण्यात येणार होती. तथापि, काही अभिमत विद्यापीठांनी केलेल्या याचिकेत त्यांना स्वतंत्रपणे यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया करू द्यावी, अशी विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज या संदर्भातील सुनावणी अपूर्ण राहिली. त्यावर मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयानंतरच अभिमत विद्यापीठांतील वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशाबाबतची प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना आवरा!मुंबई : राज्यातील अभिमत विद्यापीठांसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय शिक्षणासाठी अवाजवी शुल्क आकारणी सुरू असल्याच्या निषेधार्थ पालकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. प्रेसक्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण शुल्क समितीला साकडे घालत अवाजवी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कारवाईची मागणी पालक वर्गाने केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यंदा खासगी महाविद्यालयांतील प्रवेश नीट परीक्षेनुसार होत आहेत. मात्र देशभर एकच परीक्षा लागू करणाऱ्या प्रशासनाने सर्व महाविद्यालयांत एकच शुल्क ठेवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, सर्व प्रशासकिय यंत्रणांकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये १६० ते १८० गुण मिळाल्यानंतरही नीटच्या सक्तीमुळे खासगी महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग खडतर झाला आहे. महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट सुरू असून, सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. शिक्षण शुल्क समितीकडून तत्काळ दखल घेतली जात नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. खासगी महाविद्यालयांनी संकेतस्थळांवर शुल्क जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांना बगल दिली जात आहे, असा आरोप पालकांनी केला. विद्यार्थी संघटनांचा पाठिंबामहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पालकांच्या या लढ्याला पाठिंबा दिला आहे. मनविसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.