शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: January 20, 2017 04:14 IST

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

उल्हासनगर : मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र ओमी कलानींच्या निर्णयाभोवती राष्ट्रवादी गुरफटल्याने आघाडीची बोलणी लांबणीवर पडली आहे. ओमी टीमच्या हट्टामुळे आघाडीची बोलणीही रखडली आहे. ओमी कलानींचा भाजपा प्रवेश टळला तर राष्ट्रवादी ओमी टीमला घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून काँग्रेसलाही स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवारांची तयारीही सुरु केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असली तरी पक्षांतराचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ओमी कलानी भाजपाच्या संपर्कात असल्याचे दिसत असले तरी भाजपाने अद्याप त्यांना हिरवा कंदील न दाखविल्याने ओमी टीम ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली शहरभर प्रचाराचे काम करत आहेत. ओमींचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. ओमी टीमला काँग्रेससोबत निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे स्पष्ट असले तरी काँग्रेसने आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे ओमीच्या हट्टामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आघाडीच्या बोलणीसाठी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ओमींचा भाजपा प्रवेश टळावा ही इच्छा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आहे. ओमी टीमने शहरात चांगला दबदबा निर्माण केल्याने ओमी ज्या पक्षात राहतील त्याला सत्तेची गणिते सोपी होणार आहे. भाजपाने ओमीचा स्वीकार केल्यास उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ही नावापुरती राहणार हे निश्चित. अशा पडतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येणे शक्य होणार आहे. ओमी टीमला काँग्रेसची अ‍ॅलर्जी असल्याने नवीन समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे. >चांगले उमेदवार दिल्यास मतदार पक्षासोबतचकाँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा जरी कमी असला तरी काँग्रेसच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग उल्हासनगरमध्ये आहे. मतदारांसमोर चांगले उमेदवार दिल्यास मतदार काँग्रेस पक्षासोबत राहतील असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेच कमी पडणार नाही. मतदारांपुढे एक पर्याय म्हणून ठामपणे काँग्रेसचे उमेदवार जातील.- निलेश पेंढारी, प्रभारी- उल्हासनगर ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड जाणार आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व गणित हे कलानी कुटुंबियांभोवती रेंगाळत आहे. तर काँग्रेसचे सर्व गणित हे इतर पक्षातील नाराज उमेदवारांभोेवती फिरत आहे.