शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

By admin | Updated: June 24, 2016 05:07 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

यदु जोशी,  मुंबईराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लांबलेला पाऊस, मुख्यमंत्र्यांची विस्ताराबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी अद्याप बाकी असलेली चर्चा, शिवसेनेशीही न झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर विस्तार लांबणीवर पडला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना आपापल्या खात्याचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यामुळे कमीच दिवस मिळतील, असे दिसते. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, नव्या मंत्र्यांची नावे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री हे पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात असून, पुढच्या आठवड्यात परतणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांचा विस्तारात समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री त्यांच्याशीही चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात पंतप्रधानांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे मात्र कौतुक केले होते. सरकार पाडण्याची भूमिका शिवसेना घेणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले स्नेहाचे संबंध लक्षात घेता, विस्तारात सेना सहभागी होण्याबाबत अडचण येणार नाही, असे मानले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या लहान मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, या बाबतची अनिश्चितता कायम आहे. आ. महादेव जानकर, खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या अलीकडे गाठीभेटी घेऊन मंत्रिपदाची गळ घातल्याचे सांगितले जाते.