शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प अहवाल ३ महिन्यांत देणार

By admin | Updated: May 17, 2016 03:30 IST

अंधेरी ते विरार टप्पा आणि सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्पाचा सुधारित अहवालावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)काम केले जात आहे.

मुंबई : चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पांतील अंधेरी ते विरार टप्पा आणि सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्पाचा सुधारित अहवालावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)काम केले जात आहे. दोन्ही प्रकल्पांचे अहवाल येत्या तीन महिन्यात पूर्ण करुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला सादर केले जातील, अशी माहीती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहीती देण्यात आली. यात प्रथम वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमोडल एलिव्हेटेड कॉरीडोरही बांधण्यात येणार असून त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण तीन महिन्यात हे अहवाल बनविले जातील आणि त्यानंतर रेल्वे मंत्रालय तसेच राज्य सरकारपुढे सादर केले जातील, अशी माहीती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. चार ते पाच वर्षापूर्वी दोन्ही प्रकल्पांचे सर्व्हेक्षण झाले होते. मात्र त्यात बदल असल्याने सुधारित अहवाल तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.