शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून

शरद जोशींची घोषणा: आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीरनागपूर : ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून शेतकरी संघटना पुढच्या काळात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले.शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांपुढे जोशी यांनी आज आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आंदोलनासाठी मुंबई-दिल्ली-पुणे येथे जाणे शक्य नाही. त्यांना ते परवडतही नाही. त्यामुळे आपल्या गावात राहूनच पुढाऱ्यांना गावबंदी करा, त्यातून भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना वगळू नका, असे जोशी यांनी निक्षून सांगितले. ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या याच आंदोलनामुळे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांना त्याचा फटका बसला होता. या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे तेच आंदोलन नव्या जोमाने करण्याचे आवाहन जोशी यांनी केले. ‘गावबंदी’च्या जुन्याच अस्त्राद्वारे नव्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न संघटनेने सुुरू केला आहे. मोदींनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावेसंपूर्ण देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरे करून काही देशांना आर्थिक मदतही करीत आहे. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, असे जोशी यांनी आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात सरकार येऊन एक महिना झाला. या काळात सरकारने अनेक निर्णय घेतले. त्याचप्रमाणे शेतमालाच्या भावासंदर्भात निर्णय घ्यावा. अल्पमतातील सरकार केव्हाही कोसळू शकते. त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुढच्या निवडणुकीत शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, असे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)