शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

राणी बाग मासिक शुल्कावरून निषेध फलक

By admin | Updated: May 28, 2017 19:38 IST

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील प्रवेशाच्या तिकीट दरवाढीवरून राजकीय आखाडा सुरूच आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील प्रवेशाच्या तिकीट दरवाढीवरून राजकीय आखाडा सुरूच आहे. राणीबागेतील तिकीट दरवाढ कमी केल्यानंतरही प्रभात फेरीसाठी आकारण्यात येणाऱ्या मासिक शुल्कवाढीवरून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी परिसरात निषेध फलक झळकावले आहेत.याआधी तिकीट दरवाढीविरोधात भाजपाने परिसरात निषेधाचे फलक झळकावले आहेत.त्यानंतर झालेला विरोध पाहून प्रशासनाने प्रस्तावित तिकीट दरवाढ काही अंशी कमी केली. मात्र मासिक शुल्कातील वाढ जैसे थे ठेवली. यासंदर्भात लोखंडे म्हणाल्या की, राणीबाग हे गिरणगाव परिसरात असून परिसरात आजही गिरणी कामगार आणि त्यांचे वारस हजारोंच्या संख्येने वास्तव्य करत आहेत.बहुतेक नागरिकांना शुद्ध हवा, वजन कमी करणे अशा विविध वैद्यकीय कारणास्तव सकाळी प्रभात फेरीसाठी राणीबागेत यावे लागते. वृद्धापकाळामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत म्हणून यावे लागत असल्याची अनेक उदाहरणे याठिकाणी दिसतात. अशा परिस्थितीत मासिक शुल्कात पाचपट वाढ करणे, अन्यायकारक ठरते. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल, अशी दरवाढ करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.महापालिकेला महसूल मिळावा आणि उद्यानाच्या देखरेखीसाठी शुल्कवाढ आवश्यक आहे, मात्र त्यासाठी ३० रुपयांऐवजी थेट १५० रुपये आकारून पर्यटकांसह गरजू नागरिकांच्या खिशाला कात्री का म्हणून लावायची? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. ३० रुपयांमध्ये दरवाढ करून त्याठिकाणी कमाल ५० रुपये आकारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महासभेत मासिक शुल्कवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्यास राणीबागसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे.