शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘जादा काम’ करून निषेध

By admin | Updated: November 3, 2015 03:16 IST

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद करणे, संप करणे हे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे नित्याचेच हत्यार असते. सोमवारी मात्र त्यांनी आंदोलनात अनोखी ‘गांधीगिरी’ दाखविली.

मुंबई : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद करणे, संप करणे हे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे नित्याचेच हत्यार असते. सोमवारी मात्र त्यांनी आंदोलनात अनोखी ‘गांधीगिरी’ दाखविली. मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी कामकाजाची वेळ संपल्यानंतरही तब्बल दोन तास ‘जादा काम’ करीत अनोखे आंदोलन केले. सर्व कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी थांबून राहिले. राज्य शासनाने आतातरी दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा यापुढे आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविली जाईल, असा इशारा मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी यांनी दिला. पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व त्याची थकबाकी मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मागणी होत आहे. त्यासाठी २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप केला होता. मात्र राज्य सरकार त्याची दखल घेत नसल्याने २ नोव्हेंबरला गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतरही शासकीय कार्यालयातील कर्मचारी थांबून राहिले. कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी, पोलीस आयुक्तालय कर्मचारी संघटनेचे चिटणीस गोकूळ देवरे व अन्य पदाधिकारी हे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देत पुन्हा कार्यालयात पाठवत होते. रात्री ८च्या सुमारास सर्व जण कार्यालयातून बाहेर पडले. संपूर्ण राज्यात आज अशा पद्धतीने शासनाचा निषेध करण्यात आल्याचे बकशेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)