शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

कचरा टाकण्यास हरित लवादाची मनाई

By admin | Updated: June 11, 2016 01:31 IST

सासवड नगरपालिकेचा जमा होणारा कचरा कुंभारवळण येथे टाकण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने तूर्तास २९ जुलैपर्यंत मनाई केली आहे.

सासवड : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता होईपर्यंत सासवड नगरपालिकेचा जमा होणारा कचरा कुंभारवळण येथे टाकण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने तूर्तास २९ जुलैपर्यंत मनाई केली आहे. नागरिकांना कचरा प्रदूषणामुळे आरोग्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य खात्याला देण्यात आलेले आहेत.पुरंदर हायस्कूलसमोर कोणतीही प्रक्रिया न करता सासवड नगरपालिका उघड्यावर कचरा टाकत होती. त्याविरोधात डॉ. उदयकुमार जगताप यांनी केलेल्या याचिकेवरही निर्णय देत नगरपालिकेने उघड्यावर कचरा टाकू नये, असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे नगर परिषदेने कुंभारवळण परिसरात शासकीय जागा घेऊन, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेऊन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला होता व न्यायालयाचे आदेशाने प्रक्रिया सुरू केली होती. कचरा प्रकल्पाविरोधात एखतपूर-मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी व खळद येथील ग्रामस्थ आणि पुरंदर पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामथे, अ‍ॅड. श्रीकांत ताम्हाणे, महादेव टिळेकर, बाळासाहेब झुरंगे, शरद टिळेकर यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयनुसार नगरपालिका कार्यवाही करणार आहे. त्यानंतर पुढील तारखेला तसा अहवाल सादर करून कचरा प्रक्रिया करण्यास परवानगी मागणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.>जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, ‘सासवडमधील काचऱ्यावर सासवड परिसरातच प्रक्रिया करावी. सासवड येथील वाघ डोंगर परिसरात नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे तेथील शिल्लक जागेत प्रक्रिया केंद्र उभारावे. त्यासाठी आपण शासनाकडून सर्र्व निधी उपलब्ध करून देऊ. याबाबत बैठक घेऊ,’ असे सुचविल्याचे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी सांगितले. पाण्याच्या टाकीजवळील जागा प्रक्रिया केंद्रास अपुरी आहे. शासनाकडून शिवतारे यांनी जागा मिळवून द्यावी. नगरपालिका प्रक्रिया केंद्र उभारेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पुणे शहरातील प्रक्रिया केंद्राची पाहणी करावी व तशी प्रक्रिया केंद्रे सासवडमध्ये करावीत, असेही शिवतारे यांनी सुचविले होते. नगराध्यक्षांनीआपण पुणे येथे जाऊन यापूर्वीच पाहणी केली असल्याचे सांगितले.