शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाहणीस मज्जाव; महापालिकेची तक्रार

By admin | Updated: November 6, 2014 04:07 IST

डेंगीच्या डासांची पैदास ही घरात स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंगी रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे

मुंबई : डेंगीच्या डासांची पैदास ही घरात स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंगी रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये अनेक वेळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेटवरच अडवले जाते. त्यामुळे अशा परिसरांमध्ये तपासणी करणे शक्य होत नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील उच्चभ्रू विभागांमध्ये, सोसयट्यांमध्ये आम्हाला सहकार्य केले जात नाही. आणि याच भागांमध्ये ५१ टक्के डासांची पैदास झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. पावसाळा संपून एक महिना उलटला आहे, तरीही हिवाळा अजूनही सुरू झालेला नाही. हे वातावरण डासांची पैदास होण्यास पोषक असल्यामुळे डेंगीच्या डासांची पैदास अजूनही होत आहे. डेंगी रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. रेडिओवरून जिंगल्सद्वारे, वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे, टीव्हीवरील जाहिरातीतून केंद्र सरकारही जनजागृती करीत आहे, असे देशमुख यांनी सांगितले. डेंगीचा ताप आल्यावर रुग्ण स्थिर असतानाही त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात. हे कशामुळे होते, विषाणूंमध्ये काही बदल झाले आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी रक्त चाचण्या केल्या जात आहेत. या अभ्यासामुळे अजून काही गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होईल, असे डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. डेंगी झालेल्या रुग्णांच्या घरी आणि आजूबाजूच्या घरांमध्ये देखील डासांची पैदास होते आहे का, याची तपासणी केली जाते. ८५ टक्के वेळा डेंगी झालेल्या रुग्णाच्या घरी किंवा बाजूच्या घरातच डेंगीच्या डासांची पैदास झाल्याचे आढळले आहे. आॅक्टोबर २०१४ मध्ये डेंगीचे ३ हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर २०१४ मध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत ६५९ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. २०१३ या वर्षात डेंगीचे एकूण ९२७ रुग्ण आढळून आले होते. महापालिकेचे एकूण ९०० कर्मचारी हे डेंगी, मलेरिया रोखण्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचारी दिवसाला ४५ ते ५० घरांची पाहणी करतो. दर महिन्याला ७ लाख घरांची पाहणी केली जाते. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांमध्ये एकूण ९ ते १० लाख घरांची पाहणी करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत १३ हजार २४७ जणांना नोटीस पाठविली आहे. यापैकी ३४४ जणांवर खटला भरण्यात आला आहे.