शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’!

By admin | Updated: April 16, 2015 01:48 IST

अभियांत्रिकाच्या रिक्त जागा भरण्याचे राज्यभरातील महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे़

योगेश पांडे - नागपूरअभियांत्रिकाच्या रिक्त जागा भरण्याचे राज्यभरातील महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे़ त्यातून मार्ग काढण्यासाठी आता थेट प्राध्यापकांनाच विद्यार्थ्यांचे टार्गेट दिले जात असून, त्याद्वारे मिशन अ‍ॅडमिशन राबविले जात आहे़ २०१४-१५ या वर्षात राज्यभरात ४० टक्क्यांहून अधिक तर एकट्या नागपूर विभागात ४५ टक्के जागा रिक्त होत्या.राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘जेईई-मेन’ (जॉईन्ट एन्ट्रन्स एक्झाम) १० व ११ एप्रिलला झाली. बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रांवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रतिनिधी संस्थेचे माहितीपत्रक वाटताना दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘जेईई’च्या परीक्षेच्या दिवशी तर चक्क प्राध्यापक मंडळीदेखील परीक्षा केंद्राबाहेर पालकांना महाविद्यालयांबाबत माहिती देताना दिसून आले. अनेक महाविद्यालयांनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’ दिले आहे. नागपुरातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांना प्रत्येकी पाच विद्यार्थी आणण्यास सांगितले आहे. यामुळे प्राध्यापक मंडळी चिंतित असल्याची माहिती एका जेष्ठ प्राध्यापकाने नाव न घेण्याच्या अटीवर दली.राज्यातील ३६० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांत दीड लाखांहून अधिक जागा आहेत. मागील वर्षी यातील सुमारे ४० टक्के म्हणजे ६४ हजारांहून अधिक जागा रिक्त होत्या. यंदादेखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता अनेक महाविद्यालयांनी ‘मॅनेजमेंट कोटा’तून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.च्अनेक महाविद्यालयांच्या प्राध्यापक व प्रतिनिधींनी उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेतली आहे. ‘एज्युकेशन फेअर’ तसेच थेट संपर्काच्या माध्यमातूनदेखील महाविद्यालयांकडून विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. च्अनेक महाविद्यालयांनी तर ‘कमिशन एजंट’देखील नेमले आहेत. अनेक जण विद्यार्थ्यांशी ‘आॅनलाईन’ संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वर्षजागारिक्त जागा२०१०-१११,१४,२६८२०,८४०२०११-१२१,३४,०२४३०,७१५२०१२-१३१,४८,२९४४१,६०३२०१३-१४१,५४,८२७५२,४००२०१४-१५१,६३,०००६४,००० (सुमारे)अनेक खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. याचे कारण म्हणजे तेथील दर्जा. प्रवेशासाठी महाविद्यालये कुठल्या ‘मार्केटिंग’ फंड्याचा उपयोग करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर त्यांनी दर्जावर भर दिला तर त्यांना धावपळ करण्याची गरज भासणार नाही़ - गुलाबराव ठाकरे , विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय