शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

देहेणची उत्पादने जाणार युरोप, कॅनडा, अमेरिकेच्या बाजारात

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

वनौषधी प्रकल्प : ३५ एकरवरील प्रकल्पाला परदेशी पाहुण्यांची भेट

दापोली : कोकणातील शेतकऱ्याने केवळ भात, आंबा, काजू यावर अवलंबून न राहता वनौषधी शेती केल्यास एकरी लाखो रुपये मिळू शकतात, असा हा वनौषधीचा प्रोजेक्ट लक्ष्मीकांत व रमाकांत हरलालका यांनी ३५ एकरवर उभा केला आहे. त्यांच्या या वनौषधी प्रकल्पाला युरोप, कॅनडा येथील उद्योजकांनी भेट दिली असून, कोकणातील हर्बल प्रोडक्टला विदेशात मोठे मार्केट उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देहेण- सुकोंडी येथे लक्ष्मीकांत हरलालका या शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणावर चंदन लागवड केली आहे. चंदनाचे फायदे मानवी जीवनात खूप आहेत. चंदनापासून तेल काढून परदेशात पाठविल्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते. चंदनाप्रमाणेच अगरउड, दालचिनी, लेमन ग्रास, पचोली, सालऊड यांसारख्या वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. हरलालका या शेतकऱ्याने देहेन येथे ३५ एकर शेतीमध्ये चंदन, सोनचाफा, काजू, आंबा याचीही लागवड केली आहे. कोकणातील वनौषधीपासून उत्पादने बनवून थेट विदेशी मार्केटमध्ये पाठविण्याचे धाडस या शेतकऱ्याने केले आहे. ३० एकर जमिनीवरील चंदन लागवडीमध्ये तुरीची लागवड करुन चंदनाला पोषक वातावरणसुध्दा निर्माण करण्यात आले आहे. चंदनाच्या रोपासोबत तूर लागवड केल्यास तुरीच्या झाडापासून नायट्रोजन मिळते. चंदनाचे झाड चांगल्या पध्दतीने वाढायला मदत होते. सेंद्रिय शेतीत चंदनाची लागवड करुन त्या झाडापासून चार वर्षात चंदन मिळायला सुरुवात होते. चंदनाची लागवड कोकणातील शेतीला फार उपयुक्त असून, चंदनाच्या झाडापासून तेल व पॉवर तयार करण्याचे युनिटसुध्दा त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कोकणातील वनौषधीची विविध उत्पादने प्रथमच परदेशी वारी करणार आहेत. कोकणच्या उद्योजकांसाठी ही नक्कीच आशादायी बाब आहे.(प्रतिनिधी)कोकणातील वनौषधी शेती पाहून खूप आनंद झाला. हे काम खूप चॅलेंजिंग आहे. कॅनडामध्ये मिळणारे प्रोडक्ट एवढे चांगले नसते. इथल्या प्रोडक्टला कॅनडामध्ये खूप मागणी आहे. येथील तेल, झाडे, फुले, सगळं काही उत्कृष्ट आहे.-विलणीयस, उद्योजक प्रोसेसिंग युनिटद्वारे साहित्य तयार करुन होणारे उत्पादन थेट परदेशी मार्केटमध्ये पाठविण्यात येत आहे. कोकणातील सेंद्रिय शेतीतील हर्बल उत्पादनाला परदेशात मोठी मागणी असून, किंमतही चांगली येत आहे. विदेशी उद्योजकांनी हर्बल फार्मला भेट देऊन येथील शेतीची पाहणी केली. भविष्यात कोकणातील सर्व नैसर्गिक प्रोडक्टस्ना विदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी परदेशी उद्योजकांनी दिली.