शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांचे उत्पादन

By admin | Updated: June 10, 2014 01:05 IST

जिल्ह्यात मागील एक वर्षात शासकीय नोंदीनुसार नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. वास्तविक मासोळ्यांच्या उत्पादनाचा आकडा यापेक्षाही जास्त असून येथील मासोळ्या अगदी

जिल्ह्याबाहेरही मागणी : गोंदिया जिल्ह्यात १९00 तलावांत होते उत्पन्नदेवानंद शहारे - गोंदियाजिल्ह्यात मागील एक वर्षात शासकीय नोंदीनुसार नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. वास्तविक मासोळ्यांच्या उत्पादनाचा  आकडा यापेक्षाही जास्त  असून येथील मासोळ्या अगदी पश्‍चिम बंगालपर्यंत पाठविल्या जात आहे. शासकीय नोंदीनुसार उत्पादन झालेल्या नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांच्या विक्रीतून जिल्ह्यात सहा कोटी रूपयांचा लाभ मासेमार्‍यांना झाला आहे.  पाटबंधारे विभागाच्या ६५ तलावांत मासोळ्यांचे उत्पादन घेतले जाते. १0 हजार ९४४ हेक्टर जलक्षेत्राचा मासोळ्या उत्पादनासाठी उपयोग केला जात  आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या १३७0 तलावांतही मासोळ्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी ५८२२ हेक्टरचे जलक्षेत्र घोषित करण्यात आले आहे.  गोंदिया जिल्ह्यात १३४ मत्स्य पालन सहकारी संस्था कार्यरत आहेत. यात गोंदिया तालुक्यात १९, तिरोडा तालुक्यात १३, सालेकसा तालुक्यात ८,  सडक/अर्जुनी तालुक्यात २२, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात २७, आमगावात १२, गोरेगावात १८ व देवरी तालुक्यात १४ मत्स्यपालन सहकारी संस्था  आहेत. या संस्थांमधील ९१५0 सदस्य मत्स्यपालन व्यवसायात जुळलेले आहेत. गोंदिया जिल्हा मत्स्यपालन सहकारी संघ सदर सहकारी संस्थांवर  नियंत्रण ठेवते. जिल्ह्यात मत्स्य पालनासाठी सहा कोटी मत्स्य बियांची आवश्यकता आहे. इटियाडोह व अंभोरा येथे शासनामार्फत मत्स्य जिर्‍यांची निर्मिती केली जाते.  मासोळ्यांना प्रजननक्षम बनविणे, प्रजनन करणे व देखभाल करण्याचे काम तेथे केले जाते. अंभोरा येथे १.३५ कोटी मत्स्य जिर्‍यांची पैदास होते. अंभोरा येथे इटियाडोहवरून मत्स्य जिरे आणून टाक्यात सोडले जातात. तेथे त्यांची देखभाल केली जाते व प्रजननयोग्य बनविले जाते. इटियाडोह व  अंभोरा या दोन्ही ठिकाणी १0 लाख मत्स्य बिजांची निर्मिती होती. मत्स्य बियांची निर्यातसुद्धा केली जाते. आता मत्स्य निर्मिती जिल्ह्यात स्वयंपूर्ण झाली  आहे.जिल्ह्यातील नागरिक पाच कोटींच्या मासोळ्या दरवर्षी फस्त करतात. जिल्ह्यात अनेक खासगी तलाव आहेत. त्यांच्या संख्येची कसलीही नोंदणी  मत्स्य सहसंचालकांच्या कार्यालयात उपलब्ध नाही.