शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीवरून धुमश्चक्री !

By admin | Updated: September 6, 2015 00:47 IST

आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून शाहीमार्गावरून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराजप्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर शनिवारी साधुग्राममधील

नाशिक : आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून शाहीमार्गावरून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराजप्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर शनिवारी साधुग्राममधील साधू-महंतांनी हल्लाबोल केला. संतप्त साधूंनी मिरवणुकीतील वाहनाची तोडफोड करीत भाविकांवर लाठ्या, शस्त्रे उगारल्याने एकच गोंधळ उडाला.पोलिसांनी मध्यस्थी करीत आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक अन्य मार्गाने वळवल्याने अनर्थ टळला. कुंभमेळ्यात यंदा प्रथमच कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टने आत्मा मालिक ध्यानपीठ उभारले आहे. पोलिसांच्या परवानगीनंतर त्यांनी शनिवारी दुपारी साधुग्राममधून शाहीमार्गानेच गोदाघाटावर मिरवणूक निघाली. मिरवणूक पंचवटी भागात येताच अनेक साधू लाठ्याकाठ्या, तलवारी, कुऱ्हाडी, भाले आदी शस्त्रास्त्रे घेऊन ध्यानपीठाच्या भाविकांवर चालून आले. काही भाविकांना धक्काबुक्की करीत त्यांनी मिरवणुकीतील एका वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटांची समजूत काढली. शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याचा अधिकार व मान केवळ आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनाच असून २० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान कोणालाही मिरवणुकीची परवानगी देऊ नये, असे पत्र आखाड्यांनी आधीच पोलिसांना दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारचा प्रसंग ओढावला. साधुग्राममधील मुख्य मार्गावरून आखाड्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येत नाही. तसे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यानंतरही मिरवणूक काढल्याने विरोध केला. - श्री महंत धरमदास, निर्वाणी आखाडा

मिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी तिन्ही अनी आखाड्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. आत्मा मालिक ध्यानपीठाने आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक होते.- श्री महंत कृष्णदास, दिगंबर आखाडा

कोणाची तक्रार आल्यास तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तथापि, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद टाळावा. - अविनाश बारगळ, पोलीस उपायुक्त