शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

'महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ'

By admin | Updated: September 24, 2016 01:49 IST

महाराष्ट्रातील पात्र महाविद्यलयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यात येईल.

मुंबई : महाराष्ट्रातील पात्र महाविद्यलयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यात येईल. तसेच हे धोरण अधिक सुस्पष्ट करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, महाराष्ट्र (रुसा) यांच्या वतीने पात्र महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतच्या चर्चासत्राचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सेंट झेविअर्स महाविद्यालयात झाले. या वेळी रुसाच्या महाराष्ट्राच्या प्रकल्प संचालक मनीषा वर्मा उपस्थित होत्या.तावडे यांनी चर्चासत्राला उपस्थित विविध विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतची मते जाणून घेतली. स्वायत्ततेसंदर्भात उद्भवणाऱ्या अडचणी, याबाबतच्या सूचना तावडे यांनी या वेळी समजून घेतल्या. महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे, तसेच स्वायत्तता धोरणाबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने येत्या तीन महिन्यांत या विषयाचा अभ्यास करून त्यावर नक्कीच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. महाविद्यालयांच्या स्वायत्ततेबाबत आजच्या चर्चासत्रात सविस्तर चर्चा करून काही महाविद्यालयांचे ग्रुप तयार करून त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याची सूचनाही तावडे यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)