शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुतेंच्या साईकृपा कारखान्याच्या लिलावाची प्रकिया सुरू

By admin | Updated: October 26, 2016 00:25 IST

बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 26 - शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये थकविल्याने माजीमंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे. कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी देणी दिली जाणार आहे. कारखान्यांच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखान्यांची किंमत काढण्याचे आदेश श्रीगोंदा तहसीलदारांना मंगळवारी दिला आहे. बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले थकविली आहेत. थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेवून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद़ पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा कारखान्याचे कैलास जरे, एच़ आऱ मुंडे, चंद्रकांत गुंगे, आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर, काँ. बाबा आरगडे, विधी सल्लागार अ‍ॅड. कारभारी गवळी, देविदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते. साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची ३५ कोटींची ऊसाची बिले थकविली आहेत ती मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला़ मात्र प्रशासानाकडून कार्यवाही होत नव्हती़ अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या दिशने प्रशासनाने पावले उचलली आहेत़ त्यात बँकेचीही कारखान्याकडे थकबाकी आहे. प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबऱ्यावर सरकारचे नाव लावले आहे. कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्यादेखील सूचना संबंधितांना केल्या आहेत़ किंमत निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे़ कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे देण्याचे अश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार पैसेसाईकृपा कारखान्याची विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे. कारखाना ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे देण्याचे अश्वासन कवडे यांनी यावेळी दिले.