शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: April 30, 2016 02:51 IST

तालुक्यातील कुंडलिका नदीकाठी न्हावे, गोफण, शेणवई, भालगाव, यशवंतखार या ठिकाणी वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे.

रोहा : तालुक्यातील कुंडलिका नदीकाठी न्हावे, गोफण, शेणवई, भालगाव, यशवंतखार या ठिकाणी वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. या ठिकाणच्या खाडीतून अनधिकृत वाळू उत्खनन करण्यात येत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात येत आहे. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर महसूल खात्याला जाग आल्याने तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून सव्वापाच लाखांची वाळू जप्त करण्यात आली. रोहे तालुक्यातील अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार डॉ. अमित मुंडे, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण साळवे, रोहा मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, चणेरा मंडळ अधिकारी अजित घासे, तलाठी सचिन सांबरे, प्रवीण भोईर, रवींद्र बाईत या महसूल व पोलिसांच्या संयुक्त कामगिरीने तालुक्यातील न्हावे, गोफण, शेणवई या खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महसूल व पोलीस खात्याकडून अचानक झालेल्या कारवाईमुळे वाळूमाफियांची एकच धावपळ उडाली.तालुक्यातील अनेक ठिकाणी अजूनही अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू असून त्यावर कारवाई झालेली नाही. राजकीय वरदहस्तामुळे ही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांमध्ये रेती उत्खनन सुरू असून त्यावर नियमित कारवाईची मागणी होत आहे.