शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

स्थलांतराचा प्रश्न जैसे थे

By admin | Updated: November 3, 2016 02:42 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्रातील गावांतील प्रकल्पग्रस्तांकडून स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील नऊ गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच प्रत्यक्ष भूखंडांचा ताबाही देण्यात येणार आहे. तसेच त्यांना अठरा महिन्यांचे घरभाडे व बांधकाम खर्चही दिला जाणार आहे. मात्र स्थलांतरासाठी प्रकल्पग्रस्तांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्यांवर सिडकोकडून अद्यापि निर्णय होणे बाकी आहे. जोपर्यंत या मागण्यांचा विचार होत नाही, तोपर्यंत स्थलांतर न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने सिडकोची अडचण वाढली आहे. याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. >सिडकोचे प्रयत्न सुरूचविमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील मुख्य अडसर ठरणाऱ्या गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया जलदगतीने सुरू व्हावी, यादृष्टीने सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे स्वत:हून ग्रामस्थांच्या भेटी घेवून चर्चा करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या अनेक गावांना भेटी देवून त्यांनी यासंदर्भात चर्चा केली होती. आजही सिडकोच्या माध्यमातून विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद सुरूच आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.