शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी भूमिपुत्र अडचणीत

By admin | Updated: June 5, 2017 00:51 IST

देहूकरांचे जीवन सुसह्य होणार असले तरी अनेक ग्रामस्थांना या विकासासाठी मोठा त्याग करावा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे आणि पुलांच्या उभारणीमुळे देहूगाव कात टाकत असले आणि देहूकरांचे जीवन सुसह्य होणार असले तरी अनेक ग्रामस्थांना या विकासासाठी मोठा त्याग करावा लागला आहे. येथील भूमिपुत्र जमिनीच्या आरक्षणामुळे अडचणीत आला आहे.गावातील शेतजमिनीचे प्रचंड तुकडे झाले असून, मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. देहूत शेतजमिनीला प्रती गुंठा १२ ते १५ लाख रुपये बाजारभाव आहे. मात्र, सरकारी दर या पेक्षा कितीतरी कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विकास कामांसाठी जागा संपादित होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी जागा विकल्या आहेत.मात्र, रस्त्याच्या विकासामुळे मावळ व खेड तालुक्यातील शेतजमीनीला मोठा बाजारभाव मिळत आहे. तर वजनदार राजकीय नेते व बड्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविल्या जात आहेत. देहूकरांच्या शेतजमिनीची पुरती चाळण करून विकास केला जात आहे. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रस्ताविक रिंग रोडच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आरक्षण टाकले जाईल या भीतीने जमिनी मिळेल त्या भावाने ४०-६० किंवा ४५-५५ या प्रमाणात जॉइंट व्हेंचरमध्ये विकसकांना दिल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी प्लॉटिंग जमिनी विकल्या आहेत. प्लॉट करणारे व बांधकाम व्यावसायिक आता धोक्यात आले आहेत. शेती वाचविण्यासाठी येथील शेतकऱ्यांची अवस्था विकासाची गंगा घरोघरी, भीक माग दारोदारी (विविध कार्यालये) अशी झाली आहे. वास्तविक काही कंपन्यांना वाचविण्यासाठी व खेड व मावळा तालुक्यातील राजकारण्यांशी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी काही रस्ते देहूत वळविल्याची चर्चा आहे. >शेतकरी हतबल : कार्यालयात हेलपाटे एका बाजूला विकासाची गंगा घरोघरी येत असताना येथील शेतकरी मात्र पूल व रस्त्यांच्या आरक्षणामुळे हतबल झाला आहे. आपल्या जमिनी वाचविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत असल्याची चित्र सध्या दिसत आहे. मात्र, राजकीय वरदहस्त नसल्याने कोणत्याही कार्यालयात दाद मिळत नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या शेतकऱ्यांना काही अंशी जागा वाचविण्यात यश आले आहे.काही ठिकाणी जमिनीच्या दर वाढून मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना गळ घातली जात असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांसमोर स्थानिक राजकारणी बोलू देत नाहीत. जास्त बोलू नका कारवाई करतील, अशी भीती घातली जात असल्याची तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. यामध्ये बिल्डरलॉबी व प्लॉटिंग करणारे विकसक सक्रिय असल्याची चर्चा आहे.