शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१० हजारांच्या पीककर्जासाठी अडचणींचा डोंगर!

By admin | Updated: June 18, 2017 00:51 IST

कर्जमाफीपूर्वी थकीत कर्जदारांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी १० हजार रुपये तातडीचे पीककर्ज देण्यासंदर्भात शासनाचे निकष शेतकऱ्यांना अडचणीचे असल्याची स्थिती

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीपूर्वी थकीत कर्जदारांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी १० हजार रुपये तातडीचे पीककर्ज देण्यासंदर्भात शासनाचे निकष शेतकऱ्यांना अडचणीचे असल्याची स्थिती आहे. त्यात नोटाबंदीच्या संकटानंतर जिल्हा बँकांकडे खेळते भांडवलच नसल्याने त्यांनी हात वर केले आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय केवळ घोषणा ठरण्याची भीती आहे. विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी निकष पूर्ण करतील मात्र नोटाबंदीनंतर जिल्हा बँका अचडणीत आल्या आहेत. जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अजून बदलून देण्यात न आल्याने या बँकांकडे खेळते भांडवलच शिल्लक नाहीत. तसेच नाशिक, धुळेसह १६ जिल्हा बँकांमध्ये पैसेच नाहीत.शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निकषांत बदल करण्याची मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने केली आहे. राज्य बँकेची मदतीची भूमिका...शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासाठी अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक मदत करेल. आम्ही जिल्हा बँकांना पतपुरवठा करत असतो. शेतकऱ्यांसाठी बँकांना तात्पुरती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल. शेतकऱ्यांना अचडणीत येऊ देणार नाही.- डॉ. एम. एल. सुखदेवे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक