शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील प्रोबेस स्फोटाची चौकशी गुंडाळली

By admin | Updated: October 20, 2016 04:01 IST

एमआयडीसी परिसरातील प्रोबेस एंटरप्रायझेस या केमीकल कंपनीतील स्फोटाची चौकशी गुंडाळण्यात आली

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- तब्बल १२ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एमआयडीसी परिसरातील प्रोबेस एंटरप्रायझेस या केमीकल कंपनीतील स्फोटाची चौकशी गुंडाळण्यात आली आहे. स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट करणारा फोरेन्सिक अहवाल पाच महिने उलटले तरी अजून हाती आलेला नाही. चौकशी समितीला एक महिन्यांची मुदत दिली होती. चौकशीची मुदत वाढवून देण्याची मागणी समितीने केली होती. मात्र त्याला लिखित स्वरुपात मुदतवाढ दिली गेली किंवा कसे, याची कुणालाही माहिती नाही. मुदलात प्रोबेस स्फोटाच्या चौकशीत सरकारलाच फारसा रस नसल्याने ही चौकशी गुंडाळल्याची चर्चा आहे.प्रोबेस कंपनीत २६ मे रोजी स्फोट झाला होता. त्या स्फोटाची चौकशी करण्याकरिता राज्य शासनाने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. विविध तांत्रिक कारणांमुळे अद्यापही अंतिम अहवाल तयार झालेला नसल्याने दुर्घटना नेमकी कशामुळे झाली ते कशाच्या आधारावर निश्चित करावे हा पेच समितीसमोर आहे. मुख्यमंत्र्यांनी समितीला एक महिन्याचा कालावधी दिला असला तरीही तो कमी होता. त्यानुसार एक महिन्याची मुदतवाढ मिळाली. मात्र त्यानंतरही शासनाने मुदतवाढीला मंजुरी दिली का हे गुलदस्त्यात आहे. माहितीच्या अधिकारात कंपनीतील स्फोट हा वेल्डींगचे काम सुरु असताना ठिणगी रसायनांच्या साठ्यावर उडून झाल्याचे औद्योगिक सुरक्षा संचालनालयाने दिली होती. त्या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० हून अधिक जखमी झाले होते. तसेच ३ हजाराहून अधिक घरांचे नुकसान झाले होते. जखमींवर झालेला खर्च रुग्णालयांना तर मृतांच्या वारसांना दोन लाखांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.>अहवाल नाहीच; मुदतवाढ मात्र हवीस्फोटाची चौकशी करण्याकरिता राज्य शासनाने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. गेल्या महिनाभरात या समितीची केवळ एकदाच बैठक झाली. मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल का लांबणीवर पडला याबाबत विचारले असता संबंधित अधिकारी निरुत्तर झाले. मुख्यमंत्र्यांनी समितीला एक महिन्याचा कालावधी दिला असला तरीही तो कमी होता, त्यामुळे तो वाढवून मिळावा अशी मागणी केली होती.