कल्याण : ऐतिहासिक कल्याणच्या लाल मातीत ५ मेपासून माठ्या जल्लोषात कल्याण प्रो-कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. कल्याण पूर्वेत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात या स्पर्धेसाठी आठ संघ मालकांच्या उपस्थित ८० नामवंत खेळाडूंचा खुल्या पद्धतीने लिलाव करण्यात आला.राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम प्रतिसाद मिळत असलेल्या राष्ट्रीय प्रो-कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर कल्याण प्रो कबड्डी प्रथमच शहरात होणार आहे. आठ संघांमध्ये ही स्पर्धा रंगेल. मागील आठवड्यात झालेल्या कल्याण तालुक्यातील ५६० खेळाडूंच्या निवड चाचणीतून निवडलेल्या ८० नामवंत खेळाडूंचा खुल्या पद्धतीने लिलाव झाला. कल्याण-डोंबिवली मधील राजकीय नेत्यांनी व व्यवसायिकांनी या संघाचे मालकी हक्क घेतले आहेत.कबड्डी संघाच्या मालकांमध्ये गणेश ढोणे यांचा ‘ढोणे वॉरियर्स संघ’, संजय मोरे व संजय गायकवाड या जोडीची ‘संजय टायगर्स,’ नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचा ‘लायन्स गायकवाड संघ’, लीना प्रशांत कांबळे कर्पे यांचा ‘कर्पे टायटन्स संघ’, नगरसेवक महेश गायकवाड यांचा ‘एमजी टायगर संघ’, नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा ‘दबंग शेट्टी संघ’, सुभाष ढोणे यांचा ‘रिद्धी प्राइट्स संघ’, नगरसेवक मनोज राय यांचा ‘राय पँथर्स संघ’ यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
कल्याणात ‘प्रो-कबड्डी’
By admin | Updated: April 28, 2016 03:43 IST