शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पानसरे हत्येपूर्वी विनयची टेहळणी

By admin | Updated: September 9, 2016 05:29 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबूराव पवार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबूराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केल्याचे तसेच त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला गुरुवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर न्यायाधीश यू. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजी राणे व तपास अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढविली. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तावडेवर सीबीआयने बुधवारी पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पानसरे हत्याप्रकरणातील तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र तीन महिन्यांत तपास अधिकारी सादर करणार आहेत. पाच औषधे व सात बिलेआरोपी तावडे याच्या झडतीत सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून जप्त केलेल्या साहित्यांची यादी न्यायालयास सादर करण्यात आली. त्यामध्ये तावडे याच्याकडे ३१४० रुपयांची वेगवेगळ्या पाच प्रकारची चेतासंस्थेवर प्रभाव करणारी (सीएनएस - सेंट्रल नर्व्हस सिस्टीम) शेड्युल एच व एच-१ औषधे, वेगवेगळ्या औषधांची सात बिले आणि सुरुवातीची एक ते चौदा पाने फाडलेल्या एका आवक-जावक रजिस्टरचा समावेश आहे.दोषारोपपत्र दाखल नाहीपानसरे हत्येप्रकरणी समीर विष्णू गायकवाड (आरोपी क्रमांक १) यास १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात १४ डिसेंबर २०१५ ला दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाच्या मंजुरीने भारतीय दंड संहितेच्या कलम १७३ (८) प्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या खून खटल्यात वीरेंद्र तावडे याला एसआयटीने पानसरे खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून २ सप्टेंबर २०१६ ला अटक केली आहे. त्याच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत त्यानंतर ९० दिवस असते, परंतु तावडे याच्यावर गुरुवारीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्याने गोंधळ उडाला. गुरुवारी तावडे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ती वाढवून घेण्यासाठीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर कोणतेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले नसल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी स्पष्ट केले. नार्कोटिक औषधे कशाला?तावडे याच्याकडे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमात नार्कोटिक औषधे मिळाली आहेत. तो व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्याकडे आश्रमातील वैद्यकीय विभागाची जबाबदारी होती. आश्रमाच्या झडतीवेळी त्या ठिकाणी मानवी चेतासंस्थेवर परिणाम करणाऱ्या शेड्युल एच व एच-१ प्रकारच्या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, असे निदर्शनास आले.पत्नीस चक्क तीर्थ म्हणून दिले सायकिअ‍ॅट्रिक औषधपोलीस कोठडीत असताना तावडे व त्याच्या पत्नीची रुजवात घालण्यात आली. गोवा आश्रमात डॉ. आशा ठक्कर व तावडे याच्या पत्नीची भेट झाली होती. डॉ. ठक्कर यांनी तुमच्या पत्नीस सायकिअ‍ॅट्रिक औषधाची गरज असल्याचे त्याला सांगितले. तेव्हा तावडेने साधिका सुदेशणा पिंपळे यांच्याकरवी पत्नीला तीर्थ म्हणून सायकिअ‍ॅट्रिक औषधाचा नियमित डोस दिल्याचे स्पष्ट झाले.संस्थेसाठी तो स्वत:च्या मुलीची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे नव्हता. साडविलकरकडे आलेले दोघेजण पवार, अकोलकर वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार हा २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहे. तावडेने विनय पवार व संशयित सारंग अकोलकर या दोघांना कोल्हापुरातील साक्षीदार संजय साडविलकर यांच्याकडे दोन पिस्तुले (अग्निशस्त्र) तयार करून घेण्यासाठी पाठविले होते. गोविंद पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या परिसरात गोळीबराच्या घटनेपूर्वी काही वेळ अगोदर व घटनेच्या अगोदरच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी काही व्यक्तींना संशयितरीत्या घुटमळताना पाहिले होते. त्यामध्ये विनय पवारचा समावेश होता. साक्षीदाराने हे तपासादरम्यान, त्याचे छायाचित्र पाहून सांगितले आहे. यावरून संशयित तावडे याचा गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. साक्षीदार साडविलकर यांनी यापूर्वीच त्यांच्या जबाबामध्ये तावडेच्या सांगण्यावरून दोन व्यक्ती त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर तयार करून घेण्यासाठी आल्या होत्या, असे तपासात सांगितले आहे.