प्रियकराने प्रेयसीच्या लग्नात दिली लैंगिक अत्याचाराची चीपविवाह तुटला : बलात्काराच्या आरोपाखाली प्रियकर गजाआडशेणवा - प्रेमप्रकरणातून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या विवाहाच्या वेळीच तिच्या नव-याला आहेराच्या पाकिटातून चक्क तिच्यावरील लैंगिक अत्याचाराची चित्रफीत दिली. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने पोलिसांत तक्रार केल्याने तो प्रियकर बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड झाला.या प्रकरणातील तरुणी किन्हवलीजवळील आपल्या नातेवाईकाकडे जात असता, अवैध जीप वाहतूक करणार्या शीळ गावातील प्रकाश किसन बांगर याच्या प्रेमजालात अडकली़ याचा गैरफायदा घेत प्रकाशने पडघा येथील एका हॉटेलच्या रूमवर नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला़ एवढेच नव्हे तर त्याचे मोबाईलवर चित्रणसुद्धा केले़ त्यानंतर वारंवार त्याने तिचे लैंगिक शोषण केले . दरम्यान या तरु णीचा विवाह ठरला़ प्रकाशने हे लग्न होऊ नये यासाठी तिच्यावर दबाव आणला. पण तो धुडकावून ती लग्नाच्या बोहल्यावर चढली़ यामुळे संतापलेल्या प्रकाशने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्याबरोबरच्या लैंगिक अत्याचाराच्या चित्रफितीची चीप आहेराच्या पाकिटातून नव-याला दिली. मधुचंद्राच्या रात्रीच नव-याने आहेराची पाकिटे उघडली आणि ती चित्रफित पाहिली़ त्यामुळे हादरलेल्या नवर्याने पत्नीला तातडीने तिला माहेरी पाठवून दिले. त्यामुळे तिचे संसाराचे स्वप्न उदध्वस्त झाले. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही कारवाई करूत प्रियकर प्रकाश बांगर याला बलात्कार आणि सायबर गुन्ह्यांतर्गत अटक केली असून पुढील तपास चालू आहे .
प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा अश्लिल आहेर
By admin | Updated: May 10, 2014 20:49 IST