शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराचा आत्महत्येचा ‘ड्रामा’

By admin | Updated: March 23, 2017 01:53 IST

क्षुल्लक वादातून प्रेयसीने आत्महत्या केली, ही बाब प्रियकराला समजताच, त्यानेही आत्महत्येसाठी १२व्या मजल्यावरून उडी

मुंबई : क्षुल्लक वादातून प्रेयसीने आत्महत्या केली, ही बाब प्रियकराला समजताच, त्यानेही आत्महत्येसाठी १२व्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसल्याने तो घाबरला. ग्रीलला लटकलेल्या तरुणाला पाहून सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. स्थानिकांसह कुटुंब, पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी त्याची समजूत काढत होते. तो थांबावा, म्हणून त्याच्यावर भावनिक दबाव आणत थांबण्याचा सल्ला देत होते. तासभर सुरू असलेल्या फिल्मी ड्रामानंतर, अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला आत ओढून त्याचे प्राण वाचविल्याची घटना दादरमध्ये घडली. या घटनेदरम्यान खाली नागरिकांची एकच गर्दी जमा झाली होती.दादरमधील अमेया कोआॅपरेटिव्ह सोसायटी येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून एका १७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मूळची चिपळूणची रहिवासी असलेल्या तरूणीने आत्महत्या केल्याचे समोर आले. ती डोमेस्टिक हेल्पमध्ये काम करत होती. या घटनेने खळबळ उडाली. या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच, त्याच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून एक तरुण ग्रीलला लटकलेला दिसून आला. इमारतीखाली जमलेल्या गर्दीच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या. त्याला वाचविण्यासाठी तपास पथकाने तरुणाच्या घराकडे धाव घेतली. गणेश खीर (३९) असे त्याचे नाव असून, तो पत्नी आणि मुलासोबत तेथे राहातो. त्याचे तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. तिने आत्महत्या केल्याचे समजताच, त्याने फिनेल पिऊन आत्महत्येसाठी खिडकीच्या ग्रीलमधून खाली उडी घेतली. मात्र, त्याच दरम्यान त्याचा पाय घसरल्याने खाली पाहून तो घाबरला. त्याने ग्रीलला घट्ट धरून ठेवले होते. इथे पत्नीसह पोलिसांनी त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)