शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाच्या मृतदेहाचे शीर व पाय सापडले

By admin | Updated: May 15, 2017 06:29 IST

लग्नाला भाग पाडल्याने पतीने हत्या केलेल्या वरळीतील प्रियंका गुरवच्या मृतदेहाचे इतरही भाग पोलिसांना सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लग्नाला भाग पाडल्याने पतीने हत्या केलेल्या वरळीतील प्रियंका गुरवच्या मृतदेहाचे इतरही भाग पोलिसांना सापडले आहेत. यामध्ये इतर एकाचा सहभाग समोर आला असून त्यालाही रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी रबाळे एमआयडीसी हद्दीत धड टाकल्यानंतर शीर शहापूरच्या जंगलात तर पाय अंबरनाथ मार्गावर टाकले होते.वरळीच्या सर पोचखानवाला रोड येथील स्लिपर चाळीत राहणाऱ्या सिध्देश गुरव याने लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियंकाशी लग्न करून पाचव्या दिवशीच तिची हत्या केली होती. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यापैकी धड रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आल्यानंतर मानेवरील टॅटूमुळे तिची ओळख पटली व हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सिध्देश, सासरे मनोहर व सासू माधुरी यांच्यासह त्यांना मदत करणारा दुर्गेश पटवा यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृतदेहाचे इतर तुकडे टाकलेल्या ठिकाणाची माहिती दिली. यानुसार पोलिसांनी दोन दिवसांत तिचे शीर व पाय शोधून काढले आहेत. प्रियंकाची सासरच्यांनी हत्या केल्यानंतर मृतदेह बाथरुममध्ये ठेवला होता. त्याठिकाणी पटवा याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली होती. याकरिता त्याने एक लाखाची सुपारी घेतल्याचे समोर आले आहे. याकामी पटवा याने त्याच्या एका मित्राची मदत घेतल्याचे उघड होताच त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या कारमधून मृतदेहाचे तुकडे तीन ठिकाणी टाकले होते. यावेळी मृतदेहाची ओळख पटू नये याकरिता त्यांनी शहापूरलगतच्या जंगलामध्ये तिचे शीर व अंबरनाथ मार्गावर पाय जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.