शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विजय निश्चित- प्रियांका चतुर्वेदी

By admin | Updated: June 6, 2016 03:15 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.

नागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘नॉलेज सिरीज’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी झालेल्या ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विकास, भ्रष्टाचार व समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशची झालेली दुर्दशा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील. तसेच, महिला व युवा सशक्तीकरणावर भर दिला जाईल. उत्तर प्रदेशातील मतदारांचा काँग्रेसला भक्कम पाठिंबा आहे. यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा चतुर्वेदी यांनी केला.आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुदुचेरी येथील निवडणुकांतून काँग्रेसबाबत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या. आसाम येथे काँग्रेसचा पराभव झाला असला तरी, नागरिकांचा पाठिंबा कमी झाला नाही. शिवाय कोणत्याही पक्षाला एका राज्यात चौथ्यांदा विजय मिळविणे कठीण असते. आसाम येथे काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले. पश्चिम बंगाल व केरळ येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पुदुचेरीत काँग्रेसचे शासन आले असून तामिळनाडूमध्येही अनेक जागांवर विजय मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यामुळे पक्षातील युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला आहे. इतर पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला काहीच महत्त्व नाही. परंतु, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार की, नाही यावर आताच काही बोलता येणार नाही. असे निर्णय काँग्रेस कार्यकारिणी घेते. मात्र, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावे यावर सर्वांचे एकमत आहे, असे सांगून चतुर्वेदी म्हणाल्या, वरिष्ठ नेत्यांकडे भाजपाप्रमाणे दुर्लक्ष केले जाणार नाही. ते पक्षाचा आधारस्तंभ आहेत. त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे चतुर्वेदी यांनी सांगितले.