मुंबई : तीन दशके विश्वासार्हता जपत बांधकाम क्षेत्रात आपला ठसा कायम ठेवणारी प्रिया सिमेंट कंपनी आता नव्या रूपात दिसणार आहे. कंपनीने धु्रवताऱ्यासारखाच एक तारा नव्या लाल रंगाच्या लोगामध्ये समाविष्ट केला आहे. तिसाव्या वर्धापनदिनी कंपनीने वैशिष्ट्यांमध्ये ही नवी भर टाकली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुजीत कुमार रेड्डी म्हणाले की, सिमेंट क्षेत्रात आमचा गेल्या तीन दशकांपासून दबदबा आहे. नव्या लोगोमुळे आम्ही ग्राहकांपर्यंत अधिक आक्रमकपणे पोहोचू. लोगोमधील बदल डिझाइनपुरता नाही; त्यातून सक्षमता व विश्वासार्हता ध्वनित होते. लोगोखालील ‘लाइव्ह फॉरेव्हर’ ह्या ब्रिदवाक्यातही मोठा अर्थ दडलेला आहे, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
प्रिया सिमेंटचा नवा ‘ध्रुव तारा’
By admin | Updated: August 27, 2016 05:58 IST