शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख रस्त्यांवर खासगी वाहनांचा तळ

By admin | Updated: March 6, 2017 02:47 IST

खासगी वाहनचालकांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले

सूर्यकांत वाघमारे,नवी मुंबई- खासगी वाहनचालकांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले आहे. चालकांकडून रस्त्यालगतच वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. याशिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांसह संबंधित प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्यामुळे अवैध पार्किंगमागे अर्थकारण दडल्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांलगत होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. वाशीतील अरेंजा चौक ते तुर्भे मार्गावर रस्त्यालगत मोठ्या संख्येने अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेल्या टँकरसह इतरही खासगी वाहनांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी काहींनी बेकायदेशीर गॅरेजची दुकानेदेखील थाटली आहेत. याचा फटका वाशी-तुर्भे मार्गावरील रहदारीला बसत असून त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. अवैध वाहनतळापासून काही अंतरावरच पेट्रोलपंप आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या उभ्या रासायनिक टँकरला दुसऱ्या वाहनाची धडक बसून आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून रस्त्यालगतची ही अवैध पार्किंग हटवली जात नसल्याचा संताप वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. असाच प्रकार एपीएमसी आवारातील इतरही प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. माथाडी भवन चौक ते कोपरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ट्रक, कंटेनर उभे असतात. चालकांकडून त्याच ठिकाणी स्टोव्हवर स्वयंपाकदेखील केला जातो. या प्रकारामुळे त्या ठिकाणी आगीची घटनादेखील घडू शकते. रस्त्यालगत उभ्या वाहनांमुळे गुन्हेगारी घटनांना बढावा मिळत आहे. यापूर्वी एपीएमसी व सीबीडी परिसरात हत्या व बलात्कार यासारख्या गंभीर घटनादेखील घडल्या आहेत, तर वाहनचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यानंतरही अवैध वाहनतळांचे गांभीर्य वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासन घेत नसल्याचे दिसत आहे. कोपरी येथील पुलालगतदेखील खासगी बसचे वाहनतळ तयार झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या कामगारांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बस रहिवासी क्षेत्रात उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी अनेकदा नाकाबंदी असते. मात्र, रस्त्यालगतच्या वाहनांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.>प्रमुख रस्त्यांवर पार्किंगघणसोली गावाच्या प्रवेशमार्गावरच केमिकलचे टँकर उभे करून वाहनचालकांकडून अगोदरच अरुंद असलेला रस्ता बळकावला जात आहे. तर सीबीडी स्थानकाबाहेर खासगी बसचे बेकायदेशीर वाहनतळ तयार झाले आहे. परिसरातीलच काही खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बस त्या ठिकाणी रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत; परंतु दोन लेनमध्ये पार्किंग होत असल्याने त्या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. पुलालगत अथवा पुलाखाली वाहन पार्किंग केल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास पुलाला धोका होऊ शकतो. अनेक ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेली गुन्ह्यातली वाहने ठेवण्यासाठीही पुलालगतच्या मोकळ्या जागेचा वापर केला जातो. >अधिकृत पार्किंग ओसपालिकेने अनेक ठिकाणी वाहनतळ बांधूनही ते ओस पडत आहेत, तर वाहनतळापासून काही अंतरावरच सर्रासपणे रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई असतानाही, नियमांची पायमल्ली केली जाते.दुकाने व मार्केट परिसर तसेच मॉललगतच्या रस्त्यांवर बेकायदेशीर वाहन पार्किंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मॉल चौकालगत असल्यामुळे मॉल परिसरातील वाहतूककोंडी झालेली पाहायला मिळते. यावरही कारवाईची गरज नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.