शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खासगी वाहतूक सेवा सुसाट

By admin | Updated: June 12, 2017 03:07 IST

खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांना राज्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदाच्या वर्षी खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल २८८.९४ टक्के वाढ झाली आहे.

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांना राज्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदाच्या वर्षी खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल २८८.९४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत खासगी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ११४८ वाहनांची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत अवघ्या ३४९ वाहनांची नोंदणी झाली होती. राज्यात सर्व प्रकारच्या वाहनातील एकूण नोंदणीत २.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.वातानुकूलित सेवा पुरवणाऱ्या खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे. शिवाय, स्वमालकीच्या वाहनांसाठी पार्किंगचा प्रश्न भेडसावत असल्याने ‘खासगी सेवा पुरवणारी वाहने’ प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत.राज्यभरातील एकूण वाहन नोंदणीतही २.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा २३ लाख ५६ हजार ९८१ वाहनांची नोंदणी झाली. गेल्यावर्षी २३ लाख ३ हजार ७८३ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. राज्यात सर्वात कमी वाहन नोंदणी ही मोपेड प्रकारात येणाऱ्या दुचाकीची झाली आहे. या प्रकारात यंदा केवळ १८ हजार ४७२ वाहनांची नोंदणी झाली असून, गतवर्षी ३२ हजार ७७४ मोपेडची नोंदणी होती. यंदा दुचाकी नोंदणीत अवघ्या ०.४३ टक्यांनी वाढ झाली आहे. यंदा १७ लाख ४६ हजार ५५१ दुचाकींची नोंदणी झाली आहे. गतवर्षी १७ लाख ३९ हजार ६५ दुचाकींची नोंदणी झाली होती. मुंबईकरांची दुचाकीला पसंतीमुंबईकरांचा दुचाकीकडे असलेला ओढा कायम असल्याचे मोटार वाहन विभागाच्या आकडेवाडीवरून दिसून येते. मुंबईच्या चार आरटीओ केंद्रात एकूण १ लाख ४३ हजार ६७८ वाहनांची नोंदणी झालेली आहे. गेल्यावर्षी १ लाख ४० हजार ५३२ इतक्या दुचाकींची नोंदणी झाली होती.रुग्णवाहिकेची ‘शंभरी’रुग्णवाहिकेच्या नोंदणीनेही यंदा शंभरी ओलांडली आहे. मुंबई (मध्य)- ५१, मुंबई (पश्चिम )- २५, मुंबई (पूर्व)- २४, बोरीवली -१० अशा एकूण ११० नवीन रुग्णवाहिकांची नोंद शहरातील आरटीओमध्ये करण्यात आली आहे.