शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागाला खासगी ‘विधि’ सल्ला!

By admin | Updated: May 10, 2017 02:48 IST

राज्यातील सर्वांत ‘पॉवरफुल’ विभाग समजला जाणारा गृहविभाग, आता कायदेविषयक व गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोडवणूक

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सर्वांत ‘पॉवरफुल’ विभाग समजला जाणारा गृहविभाग, आता कायदेविषयक व गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खासगी विधि सल्लागार संस्थांकडून सल्ला घेणार आहे. त्यासाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणे आणि कामाच्या ओझ्यामुळे अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई टाळण्यासाठी, हा निर्णय घेतल्याचे विभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.लक्ष्मीकुमारन व श्रीधरन, लीग लीगल इंडिया लॉ सर्व्हिसेस आणि तुली अँड कंपनी या खासगी विधि सल्लागार कंपन्यांची या कामी निश्चिती करण्यात आली आहे. प्रस्तावानंतर त्यांची छाननी व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर काम दिले जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. राज्याची कायदा व सुव्यवस्था, प्रादेशिक परिवहन, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी असलेल्या गृह विभागाला, न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये अनेक वेळा अपुरी माहिती, चुकीची माहिती सादर केल्यामुळे तोंडघशी पडावे लागते. त्यातच अनेक गुंतागुंतीचे व व्यापक कायदेविषयक प्रश्न, क्लिष्ट व गुंतागुंतीच्या प्रश्नांचा परिपूर्ण अभ्यास करण्यास पुरेसा अवधी मिळत नसल्याने, राज्य सरकारची कोर्टाकडून अनेकदा नाचक्की होते. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात खासगी विधि सल्लागार संस्थांकडून या संदर्भातील प्रस्ताव मागविले जाणार आहेत. त्यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क, कामाची किती कालावधीत पूर्तता केली जाईल, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच आवश्यकतेनुसार संबंधित योग्य कंपनीला काम देण्यात येणार आहे. गोपनीयतेबाबत साशंकता शासनाच्या सूचीवर घेण्यात आलेल्या लक्ष्मीकुमारन व श्रीधरन, लीग लीगल इंडिया लॉ सर्व्हिसेस आणि तुली अँड कंपनी या तिन्ही कंपन्या विधि सल्ल्यासाठी नावाजलेल्या आहेत. गृहविभाग त्यांना आवश्यकतेनुसार मोबदला देऊन सल्ला घेईल. न्यायालयातील अनेक प्रकरणेही संवेदनशील, संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यातील गोपनीयता ठेवण्याची हमी त्यांच्याकडून घेतली आहे. आता खरंच गोपनीयता पाळली जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.