शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

खासगी रुग्णालयांची मनमानी

By admin | Updated: January 7, 2017 01:36 IST

गेल्या काही वर्षांत कामशेत शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयाची संख्या वाढली आहे.

कामशेत : गेल्या काही वर्षांत कामशेत शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयाची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयाविषयीच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली असून, किरकोळ उपचारांसाठीही रुग्णांची मोठी लूट होते व उद्धट वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नागरिक करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार कामशेत शहरात एकूण २६ दवाखाने - रुग्णालये असून, यात १४ आंतररुग्ण विभाग (आयपीडी) व १२ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आहेत. आंतररुग्ण विभागाच्या अंतर्गत शहरात तीन अतिदक्षता विभाग (आयसीयू) आहेत. शहराच्या विस्ताराबरोबर शहरात काही वर्षांत अनेक डॉक्टर मंडळींनी व्यवसाय विस्तारला असून, शहरात मोठ्या संख्येने दवाखाने आहेत. कामशेत हे शहर असले, तरी ते ग्रामीण भागांचे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने डॉक्टर हा देवाप्रमाणेच असतो, अशी सर्वसामान्य माणसांची समजूत कायम आहे. याचाच फायदा काही व्यावसायिक डॉक्टर व दवाखाने घेत असून किरकोळ उपचारासाठीही भरमसाट बिले रुग्णांच्या माथी मारली जात आहेत. गरज नसतानाही विविध तपासण्यांच्या नावाखाली रुग्णाची आर्थिक ससेहोलपट सुरू असून, याविषयी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी जाब विचारला असता, उडवाउडवीची, उद्धट व असभ्य उत्तरे प्रतिष्ठित डॉक्टरांकडून दिली जात आहेत. (वार्ताहर)खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराविषयी कोणी काही बोलले, तर पुढील उपचार न करता त्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले जाते. शिवाय रुग्णाला काही झाल्यास आमची जबाबदारी नाही, अशी भीती दाखवली जात असल्याने रुग्ण व त्याच्या नातेवाइकांचा नाईलाज होतो. ते सर्व निमूटपणे सहन करतात. या डॉक्टर व दवाखान्यांविषयी कोणाकडे तक्रार करायची हा मोठा प्रश्न अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पडला असून, आजाराची भीती घालून अनेक डॉक्टर व हॉस्पिटलचा सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप अनेक जागरूक नागरिक करीत आहेत.>सेवा देणाऱ्यांचे व्यवसाय तेजीतशहरातील अनेक मोठे दवाखाने यांचे छोटे दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे व सोनोग्राफी सेंटर, मेडिकल स्टोअर, अ‍ॅम्ब्युलन्स आदी सेवा पुरवणाऱ्यांशी साटेलोटे असून, त्यांच्याशी हितसंबंध सांभाळून आपापले खिसे भरले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या सर्वांचे व्यवसाय लोकांच्या अशिक्षितपणामुळे जोरात सुरू आहेत. यात सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. शहरातील एका मोठ्या दवाखान्यात दुचाकीवरून पडलेल्या व किरकोळ खरचटलेल्या माणसाला अंगभर पट्ट्या बांधून पैसे उकळण्याच्या नावाखाली अ‍ॅडमिट करून विविध तपासण्या करून दोन दिवसांचे भरमसाट बिल त्याच्या हाती दिले. त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याच्या पत्नीने त्याला घरी नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनवणी करून आग्रह धरला असता, संबंधित डॉक्टरने त्या महिलेला उद्धट वागणूक दिली. ‘कामशेतची माणसे काय लायकीची आहेत आम्हाला माहीत आहे. हे हॉस्पिटल आहे; लॉज नाही. कधी या कधी जा’ अशी असभ्य भाषा वापरली. या व अशा प्रकारच्या घटना शहरातील काही हॉस्पिटलमध्ये नेहमीच घडत असून, डॉक्टरांना रुग्णाच्या आजारापेक्षा त्याचा खिसा किती मोठा आहे यातच जास्त रस असल्याचे बोलले जात आहे.