शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये खासगी बस उलटून नऊ ठार

By admin | Updated: June 12, 2017 02:41 IST

मुंबईहून बीडमार्गे लातूरकडे जाणारी खासगी बस उलटून झालेल्या अपघातात ९ ठार आणि २६ प्रवासी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (जि. बीड) : मुंबईहून बीडमार्गे लातूरकडे जाणारी खासगी बस उलटून झालेल्या अपघातात ९ ठार आणि २६ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी पहाटे ५च्या सुमारास आष्टी तालुक्यातील धानोरा घाटात घडली. मृतांमध्ये बीड, लातूर, मुंबई, पुणे जिल्ह्यांतील रहिवाशांचा समावेश आहे. बोरीवलीहून (मुंबई) लातूरला जाणाऱ्या ‘सागर’ या खासगी स्लीपर बसमध्ये ३० आसनक्षमता असतानाही ४० प्रवासी होते. सर्व प्रवासी साखरझोपेत असतानाच धानोरा घाटातील वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस १०० फूट खोल पलट्या खात गेली. या भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान अहमदनगर येथे मृत्यू झाला. अन्य २६ जखमी प्रवाशांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यापैकी २३ जखमींना सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बसचालक नरसिंग गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मृतांची नावेरशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (६०, रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड), आतिक खान मुनवर (३२, रा. सोनीमोहा, ता. केज, जि. बीड), मेहरून्निसा आमिन पटेल (३५, रा. मुंबई), आसिमा नजीम सय्यद (४५, मुंबई), सर्जेराव लक्ष्मण पवार (३०, वाटीवाडा तांडा, ता. धारूर, जि. बीड), योगेश गौतम टकले (३०, चिखली, ता. आष्टी जि. बीड), पठाण बहादूर पठाण इस्माईल (६५, रा. बसवेश्वर, जि. लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर (४५, रा. कर्वेनगर, पुणे), चाँद पाशा ताजोद्दीन पठाण (६६, रा. नेकनूर, ता. बीड).