शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार, कारागृह महानिरीक्षक डॉ. उपाध्याय यांची कल्पना

By admin | Updated: July 12, 2016 21:32 IST

कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 12 - कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे. यासाठी सार्वजनिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर १४ जुलैला पुण्यात आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने कारागृह प्रशासन कैद्यांच्या २०० मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करणार आहे. सिम्बॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. राज्यातील कारागृहांमध्ये इस्रायलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरच्या कारागृहात इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे पाच सदस्यीय पथक सोमवारपासून आहे. त्यांच्यासोबतच डॉ. उपाध्यायही येथे आले होते. निवडक पत्रकारांनी त्यांच्याशी मंगळवारी सायंकाळी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्यातील कारागृहात २९ हजार कैदी बंदिस्त आहेत. अनेक जण २० ते २५ वर्षांपासून शिक्षा भोगत असल्याने त्यांच्या पाल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये, शिकून चांगले नागरिक व्हावे, या हेतूने त्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची कल्पना होती. या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा विचार पुढे आला. पुण्यातील आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानने यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे कैद्यांच्या २०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यात १४ जुलैला त्याअनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मभूषण शां. ब. मुजुमदार या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम पुण्यात यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातील कैद्यांच्या मुलांसाठी तो राबविला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. पुढचा टप्प्यात कैद्यांंच्या मुलांशी ह्यथेट भेटह्ण हा असेल. कैद्यासोबत त्याचा मुलगा किंवा मुलगी कारागृहात थेट ४० मिनिटे राहू शकेल. कैद्याला त्याच्या मुलांचे आणि मुलांना त्यांच्या वडिलांचे (कैदी महिला असेल तर आईचे) प्रेम मिळावे आणि त्यांच्या वर्तनात, विचारात सुधारणा व्हावी, हा या थेट भेटीमागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.