शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा भोगणारे कैदी बनणार ‘उद्योगी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:44 IST

एक कोटीच्या खरेदीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; येरवडा, नागपूरसह चार मध्यवर्ती, एका जिल्हा कारागृहाला मिळणार साधने

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध गुन्ह्यांसाठी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना खऱ्या अर्थाने ‘उद्योगी’ बनविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यानुसार विविध ठिकाणच्या ५ मध्यवर्ती कारागृहांत तब्बल एक कोटीची लघुउद्योगासाठी आवश्यक यंत्र व साधन सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. तुरुंग प्रशासनाने त्यासाठी पाठविलेल्या खरेदीच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला.

पुण्यातील येरवड्यातील मध्यवर्ती व खुले, नागपूर, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात या उपकरणांची लवकरच खरेदी करण्यात येईल. कारागृह उद्योग विकासांतर्गत ती घेतली जातील. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.कैद्यांना शिक्षा भोगत असतानाच स्वयंरोजगाराचे महत्त्व कळावे, जेणेकरून बाहेर परतल्यानंतर त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर राहून उदरनिर्वाहासाठी साधन मिळावे, यासाठी त्यांच्याकडून कारागृहात शेतीपासून ते यंत्रमाग, चर्मकलापासून ते वस्त्राद्योगापर्यंत विविध कामे करून घेतली जातात. नागपूर, कोल्हापूर, नाशिक ही तीन मध्यवर्ती कारागृहे, येरवड्यातील मध्यवर्ती व खुले जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या अधिक असून त्यांच्या तुलनेत उपकरणे कमी असल्याची ओरड अधीक्षकांकडून होत होती. त्यामुळे साधन खरेदीची मागणी करण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाच्या मुख्यालयातून त्यानुसार एक कोटींची उपकरणे खरेदीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला. वित्त विभागाने खर्चास मंजुरी दिल्यानंतर खरेदीवर शिक्कामोर्तब केल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.राज्यात सध्या एकूण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ, ब, क व ड या चार स्तरांवर ४५ अशी ५४ कारागृहे आहेत. या ठिकाणी गुन्हेगाराच्या स्वरूपानुसार कच्चे कैदी (अंडर ट्रायल) व शिक्षाधीन कैदी ठेवले जातात.कारागृहात सद्य:स्थितीत २३ हजार ७५८ कैदीराज्याच्या कारागृहांतील अधिकृत बंदी क्षमता २२ हजार ३२० इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात सद्य:स्थितीत या ठिकाणी २३ हजार ७५८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २२ हजार ४०७ पुरुष तर १३५१ महिला कैदी आहेत. त्यापैकी ८५ टक्के कैदी हे न्यायाधीन म्हणजे कच्चे कैदी (अंडर ट्रायल) असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.या उपकरणांची होणार खरेदीयंत्रमाग, तारकाम, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लीनर, असेम्ब्ली वायंडर, सोलर अंबर चरखे, ली स्ट्रॅथ टेस्टर इत्यादी.